बुधवारी ढाणकी बंद (उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची ढाणकी बंदची हाक).


प्रतिनिधी,प्रवीण जोशी
ढाणकी.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा फुले, सावित्रीबाई फुले कर्मवीर भाऊराव पाटील,यांचे विरोधात आक्षेपार्ह आणि आपत्ती जनक गरळ ओकणाऱ्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोसारी, भाजपाचे नेते सुधांशू त्रिवेदी, मंगल प्रभात लोढा, चंद्रकांत पाटील, यांनी केलेल्या आपत्ती जनक वक्तव्याच्या निषेधार्थ बुधवारी दिनांक 14 डिसेंबर रोजी ढाणकी बंद ची हाक देण्यात आली आहे , महापुरुषांच्या वारंवार होणाऱ्या अपमानाच्या निषेधार्थ होत ढाणकी येथील जुने बसस्थानक रस्ता रोको करून निषेध सभेचे आयोजन करण्यात आला आहे , बुधवारी 14 तारखेला ढाणकी बंद मध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांची शिवसेना शहर प्रमुख बंटी जाधव, काँग्रेसचे शहर प्रमुख अमोल तुपेकर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव जॉन्टी विणकरे , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाप्रमुख शेख सादिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भास्कर चंद्रे पाटील यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब चंद्रे पाटील, उद्धव ठाकरे यांची शिवसेना या पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय कुंभरवार, हरिभाऊ दिलेवार, शिवसेनेचे विधानसभा सह संघटक प्रशांत जोशी, माजी उपसरपंच गणेशराव नरवाडे, युवा सेनेचे तालुकाप्रमुख संभाजी गोरटकर, माजी जि प सदस्य रमेश गायकवाड , विजय वैद्य,जुबेर पठाण, संतोष मंतेवाड, गजानन धोपटे रमेश होले श्याम भाऊ शिराळे गोपाल गौरवाड अतुल पराते सुभाष चव्हाण दयानंद महाजन दीपक रावते यांनी केले आहे,*