
प्रवीण जोशी
ढाणकी
अश्विन मासातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथी पासून शारदीय नवरात्रीला आरंभ होतो. यावेळी बावीस सप्टेंबर पासून नवरात्रीला प्रारंभ तर दोन ऑक्टोबर रोजी याची समाप्ती होणार आहे. अतिशय मांगल्य व पवित्र अशा एकूण नऊ दिवसाचा पर्वकाळ असतो. त्यामुळे चराचरातील वातावरण धार्मिक व आध्यात्मिक भक्तीयुक्त श्रद्धेला अगदी समुद्राच्या ओहोटीप्रमाणे एक प्रकारे भर असते. दुर्गोत्सव हा सालाबादानुसार शरद ऋतू वसंत ऋतूतही साजरा करण्याची प्रथा परंपरा असल्याचं काही पौराणिक ग्रंथात आढळून येते. जगत जननीचे महात्मे हे भविष्य पुराणात सांगितलेले आहे. आश्विन महिन्यात घटामध्ये घटस्थापना केल्यानंतर दिप प्रज्वलित चेतवतात पेटवतात. माया शक्तीची नऊ दिवस श्रद्धेने पूजा अर्पिने म्हणजेच घटस्थापना. हा सण आदिशक्तीची आराधना करण्याचा असतो. शेत शिवारातील पिके काढणीला आले आहेत. अशा नैसर्गिक विशेष घडामोडीत नवरात्राच्या प्रथम दिनी घटस्थापना होते. देवालयात अखंड नंदादीप, प्रत्येक दिनी झेंडूच्या व विविध फुलांची माळ असते. देवीपुढे सप्तशीतीचा पाठ अशा स्वरूपात शारदीय नवरात्री भक्ती केली जाते. किंबहुना नवरात्र हे नऊ दिवसाचे असले तरी तिथीची वेळ हे क्षय त्यात वाढ असल्याने ते आठ दहा दिवसाचे सुद्धा असेल. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अनेक भक्त उपवास करतात तर अनेक पादत्राने घालत नाहीत. अशा प्रकारे नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. खेळ म्हणजेच गरवा विशेष करून गुजरात सह थोड्याफार प्रमाणात महाराष्ट्र राज्यात गरवा खेळाला जातो. महिला मंडळी नवरात्रीला वेगवेगळ्या नऊ रंगाच्या साड्या नेसतात. गाव खेड्यांपासून ते शहरी भागात दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करतात. त्यामुळे जिकडे तिकडे वातावरण भक्तीमय असल्याची अनुभूती सर्वांना येते.
