
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
गेल्या काही वर्षांमध्ये खरीप पिक जरी शेतकऱ्यांना उत्पन्न आणि भावामध्ये दगा देत असले तरी रब्बीमध्ये हरभरा मात्र उत्पन्न आणि भाव या दोन्हीमध्ये दिलासा देत असल्याने शेतकऱ्यांना उभारीसाठी हरभऱ्याचा मोठा आधार होत आहेतllll अलीकडच्या काळामध्ये खरिपात कपाशी आणि सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी होते तसेच भाव सुद्धा या दोन्ही पिकांना फारसा समाधानकारक नसतो. शिवाय सोयाबीन तसेच कपाशीला उत्पादन खर्च बराच आहे तसेच कपाशीचे पीक हे अनेक दिवस घेते म्हणजेच कपाशी आणि सोयाबीनच्या बाबतीत खर्च व कालावधी जास्त व उत्पन्न कमी अशी स्थिती झाली आहे याउलट हरभरा पिक आहे सोयाबीन काढल्यावर शेतकरी हरभरा आपल्या शेतामध्ये पेरतात हरभरा हे रब्बीचे पीक असल्याने कमी कालावधीमध्ये येते तसेच या पिकाला खर्च सुद्धा फार येत नाही जंगली जनावरांचा या पिकाला अडथळा होतो पण झटका मशीन द्वारे वगैरे जंगली जनावरांचे व्यवस्थापन शेतकरी करतात दोन ते तीन पाण्यामध्ये तसेच दोन ते तीन फवारनिमध्ये हरभऱ्याचे पीक येते यावर्षी तर वातावरण सुद्धा हरभऱ्याला पोषक असल्याने राळेगाव शहर तसेच परिसरातील लोकांना हरभऱ्याचे समाधानकारक पीक झाले बहुतांश शेतकऱ्यांना एकरी दहा क्विंटल च्या वरती हरभरा झाला आहे आणि विशेष म्हणजे गेल्या काही वर्षापासून हरभरा पिकाच्या उत्पन्नामध्ये सातत्य आहे उत्पन्नात सातत्य असल्यामुळे यावर्षी तर अनेक शेतकऱ्यांनी शेतातील कपाशी उपटून हरभऱ्याची पिक घेतले होते बाहेर मार्केटमध्ये हरभऱ्याला पाच हजार रुपयांच्या वर दर असले तरी नाफेड मध्ये मात्र शेतकऱ्याला 5875 रुपये दर मिळणार आहे म्हणजेच हरभरा पिकाला दर ही सन्मान जनक आहे खर्च कमी व त्यातून मिळणारे उत्पन्न हे जास्त असल्याने अलीकडच्या काळामध्ये हरभऱ्याचे पीक हे शेतकऱ्यांना दिलासा देत आहेत रब्बी हंगामात ज्वारी गहू या पिकाला फाटा देत परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सध्या हरभऱ्याचे पिक घेत आहेllll प्रतिक्रिया विनोद नरड शेतकरी lllमला सात एकरात 90 क्विंटल हरभरा झाला सद्यस्थितीत हरभऱ्याला भाव सुद्धा चांगला आहे कपाशी आणि सोयाबीनच्या तुलनेत मला हरभऱ्याचे पिक परवडले आहेत खर्चाच्या मानाने हरभऱ्याचे पीक उत्पन्न चांगले देते 0 प्रतिक्रिया दोन शेतकरी गजानन पाल llll मला एका शेतात एकरी दहा क्विंटल व एका शेतात एकरी बारा क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन झाले महत्त्वाचे म्हणजे हरभऱ्याच्या पिकाला मजूर सुद्धा कमी लागतात मी हार्वेस्टरच्या माध्यमातून हरभरा काढला म्हणजेच उत्पादन खर्च,, उत्पन्न ,मजूर टंचाई , भाव या सर्व पातळीवर हरभऱ्याचे पीक सरस ठरले आहेत
