बापुसाहेब देशमुख विद्यालय जळका येथे वार्षिक स्नेहसंमेलन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा बुधवार व गुरुवार, दि.१५ ते १६  जानेवारी २०२५रोजी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या परंपरेनुसार विशिष्ठ संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी ‘जागर जाणिवांचा ‘ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम विद्यालयाच्या प्रांगणात सादर करण्यात आला.

स्त्री साक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन,  राष्ट्रभक्ती, ध्येय निश्चिती, निसर्गाबाबतची कृतज्ञता व्यसनमुक्ती या समाजमन घडवणाऱ्या विषयावर मुलांनी सुंदर सादरीकरण केले.

या वेळी गोविंद ग्रामीण शिक्षण संस्था जळका चे अध्यक्ष  मा.श्री प्रकाशराव देशमुख कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घघाटक   म्हणून उपस्थित होते श्री गजाननराव कुळकर्णी, श्री निखाडे,सौ संगीताताई ज्ञानेश्वर कोळसे,सौ प्रतिभाताई दिलिपराव हुरकुंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हे स्नेहसंमेलन केवळ नाट्य, नृत्य यांचा अविष्कार न राहता ते विचारांचे संमेलन बनले, हे संमेलन अंतर्मुख करणारे होते असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री उत्तम येपारी यांनी केले. तर सुत्रसंचलन जेष्ठ शिक्षक श्री शंकर मोहुर्ले यांनी तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक श्री प्रविण निमट यांनी केले.
     सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक शिक्षक श्री विनोद सातारकर, श्री संजीव मडावी, श्री निलेश कोल्हे यांनी मार्गदर्शन केले तर सहाय्यक शिक्षक श्री मधुकर परचाके, क.लिपिक श्री विलास खेडेकार, प्र.शा.प.श्री विठ्ठल झाडे, शिपाई गजानन कुटे , शिपाई श्री गणेश गाडे,सौ विद्या चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले.