जागतिक महिलादीनाचे औचित्य साधून भाजपा महिला मोर्चाचे वतीने महिला मेळाव्याचे पोंभूर्णा येथे आयोजन

ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार वने सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच मा.चित्रा ताई वाघ प्रदेश अध्यक्ष महिला मोर्चा यांची विशेष उपस्थिती

पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष एफ. नैताम

पोंभूर्णा:-दिनांक १२/०३/३०२४ रोज मंगळवारला श्री.आबाजी पाटील बुरांडे पोंभूर्णा यांचे प्रांगणात सकाळी ११:०० वाजता भाजपा महिला मोर्चाच्या वतीने जागतीक महिला दिनाचे औचित्य साधून भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या महिला मेळाव्याला राज्याचे वने सांस्कृतीक मत्सव्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री श्री. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार तसेच भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांची प्रमूख उपस्थीती राहणार आहे तसेच युवा व्याख्याते सोपानजी कनेरकर यांच्या ओजस्वी वाणीतून महिला साठी व्याख्यान होणार आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम बनविणाऱ्या महिला संघाचा सत्कार, महिलांचे विविध खेळ, महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि भव्य अशा महिला मेळाव्याचे आयोजन भाजपा महिला मोर्चा पोंभुर्णाचे वतीने करण्यात आले आहे.तरी तालुक्यातील महिलांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हाहन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पोंभुर्णाच्या वतीने करण्यात येत आहे.