
नांदेड जिल्हा प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड
नांदेड : गेल्या 65 दिवसांपासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. राहुल गांधी या यात्रेचे नेतृत्व करत असून त्यांचे महाराष्ट्रात आगमन झाले आहे. त्यांना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचाही पाठिंबा मिळाला आहे. आदित्य ठाकरे यांनी या यात्रेत सहभागी होऊन राहुल गांधींसोबत पदयात्रा काढली आहे.
काँग्रेसची भारत जोडी यात्रा महाराष्ट्रात पोहोचली आहे. कन्याकुमारीपासून सुरू झालेला हा प्रवास कर्नाटक, तेलंगणानंतर महाराष्ट्रात पोहोचला आहे. येथे राहुल गांधींना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचाही पाठिंबा मिळाला आहे. आदित्य यांनी राहुल गांधी यांच्या सोबत मोर्चा काढून मोठा राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. आता काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सामील होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या आदित्य यांनी आपली उपस्थिती नोंदवली आहे.
राहुल गांधी यांना मिळतोय प्रतिसाद
महाराष्ट्रात काँग्रेसची भारत जोडी यात्रा 14 दिवस चालणार आहे. राहुल गांधी विविध भागात जाऊन जनतेच्या समस्या जाणून घेणार असून काँग्रेसच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याला महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा आधीच पाठिंबा मिळाला आहे. यावेळी राहुल गांधी यांच्या भारत दौऱ्याचे अनेक चित्र समोर येत आहेत. खुद्द राहुल यांचीही वेगळी शैली पाहायला मिळत आहे. शुक्रवारी त्यांच्याकडून नाडेड येथील एका विद्यार्थ्याला लॅपटॉपही भेट देण्यात आला. खरे तर त्या विद्यार्थ्याला सॉफ्टवेअर इंजिनीअर व्हायचे आहे, पण त्याच्याकडे संगणक नव्हता. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल यांच्या उपस्थितीत त्या विद्यार्थ्याला लॅपटॉप भेट दिला.
महागाईवर काँग्रेसचा प्रहार
महाराष्ट्रानंतर भारत जोडो यात्रेचे पुढचे प्रस्थान मध्य प्रदेशात होणार आहे. 20 नोव्हेंबरला राहुल गांधी मध्य प्रदेशात पोहोचतील. तिथेही त्यांचा काही दिवस मुक्काम राहणार आहे. आतापर्यंत त्यांची भारत जोडो यात्रेला 65 दिवस पूर्ण झाले आहे. 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून या यात्रेला सुरुवात झाली. या यात्रेच्या माध्यमातून देशाला जोडण्याचा प्रयत्न केला जात असून भाजपचे अपयश जनतेसमोर आणले जात असल्याचा काँग्रेसचा दावा आहे. काही दिवसांपूर्वी नांदेडमध्येच एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, आज देशात अनेक ज्वलंत समस्या आहेत, मात्र केंद्र सरकार त्याकडे लक्ष देत नाही. हे सरकार फक्त चार-पाच भांडवलदारांसाठी काम करत आहे. नोटाबंदीमुळे देशातील छोटे उद्योग ठप्प झाले. 400 रुपयांचा गॅस सिलिंडर 1100 रुपये आणि पेट्रोल, डिझेल 100 रुपये लिटर झाले आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर चकार शब्द बोलत नाहीत, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली होती.
