

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
:. राळेगाव तालुक्यातील खैरी येथे अनंत काळाची परंपरा असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह दिनांक 26 ऑक्टोबर रोजी सुरू झाला होता त्याची सांगता 2 नोव्हेंबर रोज बुधवार ला हजारोंच्या जनसागराच्या साक्षीने झाली.
खैरी येथे अनंत काळाची परंपरा असलेला अखंड हरिनाम सप्ताह दररोज 24 तास टाळ मृदुंग व भजनांच्या गजरात गेली सात दिवस सुरू होता. या सात दिवसांमध्ये अखंड 24 तास टाळ सुरू होता तसेच दररोज भजन व पहाटे पाच वाजता काकड आरती होत होती. या सप्ताहाची बुधवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी गोपाल काला करून गावातील तसेच खेड्यापाड्यातील अनेक भजनी मंडळींच्या दिंड्या सोबत बारा महिने चालणाऱ्या चतुर्मासाच्या बारा अभंगाची फेरी सोबत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी ची गावात शोभायात्रा काढण्यात आली.
शोभायात्रा मोठ्या हनुमान मंदिरातून निघून बौद्ध विहार मार्गे आखाडा चौक, नाग मंदिर, पोचोटी हनुमान मंदिर व शेवटी बस स्टॅन्ड अशी परिक्रमा करून भजनी मंडळीच्या हरिनामाच्या गजरात ढोल ताशाच्या निनादात व फटाक्याच्या आतिषबाजीत संपूर्ण गावात फिरून शोभायात्रा परत मोठ्या हनुमान मंदिरात येऊन सात दिवस चाललेला अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. व नंतर लगेच महाप्रसादाला सुरुवात झाली. या महाप्रसादाचा लाभ खैरीसह परिसरातील अनेक गाव व खेड्यापाड्यातील हजारो भाविक भक्तांनी घेतला. यावर्षीचा महाप्रसाद खैरीचे रहिवासी परंतु हल्ली मालेगाव येथे वास्तव्यास असलेले मोरेश्वर राव बरडे यांच्या वतीने होता.
अशाप्रकारे गेल्या सात दिवसापासून सुरू असलेल्या सप्ताहाच्या सांगतेन खैरी गाव हरिनामाच्या गजरात व ढोल ताशांच्या व फटाक्यांच्या अतिषबाजीने अक्षरशा दुमदुमले होते. या अनंत काळापासून सुरू असलेल्या सप्ताहात खैरी गावातील लोकांची एकता दिसते. कोणतेही राजकीय वैर नसते. हे या सप्ताहाचे खैरी गावाचे वैशिष्ट्य आहे.
