सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील पळसकुंड (उमरविहीर) ही ग्रामपंचायत पेसा अंतर्गत येत असून या ग्रामपंचायतची निवडणूक ही माहे ऑक्टोंबर २०२२ मध्ये झालेली असताना पहिली ग्रामसभा ही डिसेंबर २०२२ मध्ये झाली त्यानंतर दुसरी ग्रामसभा ही दिं १७ ऑगस्ट २०२३ गुरवारला घेण्यात आली मात्र ग्रामसभेचा कोरम हा पूर्ण असून सुद्धा सरपंच सचिव यांनी कोणतेही कारण नसताना ग्रामसभा रद्द केल्याने येथील सरपंच सचिवावर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा गटविकास अधिकारी यांना दिं १८ ऑगस्ट २०२३ रोजी गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनातून करण्यात आले आहे.
सदर ग्रामपंचायत ही पेसा (अनुसूचित क्षेत्र पंचायत विस्तार ग्रामपंचायत आहे) ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम ५४ क ग्रामसभेच्या सभा या उपकलम ३ मध्ये स्पष्ट केले आहे की वित्तीय वर्षात इतर सर्व सभात ग्रामसभेच्या सदस्यांच्या बहुमताने अध्यक्ष हा निवडून देण्यात येईल तो व्यक्ती अध्यक्ष म्हणून काम पाहतील असे असतानाही ग्रामसेवकांनी ग्रामसभेत अध्यक्ष न निवडता आधीच अध्यक्ष ची निवड केली असल्याने गावकऱ्यांनी ग्रामसभेतच अध्यक्ष निवडीचा आग्रह केला या ग्रामसभेला गावातील जवळपास दीडशे नागरिक उपस्थित असताना व कोरमही पूर्ण असताना ग्रामसेवकाने कोणतेही कारण नसताना ग्रामसभा रद्द केली यावरून ग्रामसेवक व सरपंच यांनी विविध योजनांमध्ये भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप या दरम्यान केला आहे. पेसा सभा ही स्थानिक आदिवासी समाजाच्या जनकल्याणच्या व सांस्कृतिक रक्षणासाठी असताना पेसा कायद्याने दिलेली विशेष अधिकार आज रोजी ग्रामस्थांना वापरता येत नसून यात सरपंच ग्रामसेवक मनमानी करत आहे व कायद्याचे उल्लंघन होत असताना कायद्याचा धाक अजिबात मानत नाही व सरपंच ग्रामसेवक अरेरावी करत असून ग्रामस्थांना शिव्या दिल्या जात असून मी कोणत्याही कायद्याला भीत नसून तुम्हाला कुठे जायचे जा माझी तक्रार करा मुख्यमंत्र्याकडे केली तरी वाकडे होणार नाही असे सरपंच व ग्रामसेवक म्हणतात एवढे मुजोरी ग्रामसेवक सरपंचाची वाढली असून स्वतःच्या मानाने ग्रामपंचायत मध्ये हस्तक्षेप करतात व ग्रामस्थांना कोणत्याही विश्वासात घेतले जात नाही त्यामुळे कोणतीही विकास कामे पूर्ण होताना दिसत नाही तेव्हा आपण सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कार्यवाही करावी व ज्याला पेसा कायद्याबद्दल उत्तम ज्ञान असेल आणि गावाच्या विकासाची जाण असेल असाच ग्रामसेवक देण्यात यावा अशी मागणी पळसकुंड (उमर विहीर) येथील गावकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.