नवीन खरीप हंगामातील ई- पीक पाहणी नोंदणीकरिता तहसीलदार अमित भोईटे थेट शेताच्या बांधावर

सहसंपादक : रामभाऊ भोयर

शेतकऱ्यांच्या सातबारावर चालू खरीप हंगामातील पीक ऑनलाइन ई- पीक पाहणी अॅपवर नोंदवायची आहे. याकरिता महसूल विभाग सज्ज आहे. गुरुवारी तहसीलदार अमित भोईटे, मंडळ अधिकारी शिशिर निनावे, तलाठी मोहन सरतापे यांनी राळेगाव शिवारातील बांधावर जाऊन प्रत्येक शेतकऱ्यांना अॅपव्दारे आपल्या पिकाची नोंदणी कशी करावी, याचे प्रशिक्षण दिले. यावेळी कळमनेर, रामतीर्थ परिसरातील शेतकरी प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर उपस्थित होते. त्यांनी आपल्या अँड्रॉइड मोबाइलमध्ये आपल्या पिकाची नोंदणी करून घेतली. सर्व शेतकऱ्यांनी पिकाची नोंदणी ई-पीक पाहणी या अॅपवर करणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंदणी त्वरित करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार भोईटे यांनी केले.