
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथील पंचायत समिती प्रांगण येथे पशुसंवर्धन विभागातर्फे तालुकास्तरीय पशु, पक्षी प्रदर्शन व पशु मेळाव्याचे आयोजन रविवार (दि. १६/०३/२०२५) रोजी करण्यात आले होते. या प्रदर्शनात २५० हुन अधिक पशु-पक्षी सहभागी झाले होते. प्रदर्शनाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री, चंद्रपुर जिल्हा मा.ना.प्रा.डॉ.अशोकराव उईके हे होते. उद्घाटन डाॅ.विजय रहाटे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांचे हस्ते करण्यार आले. यावेळी अतिथी डाॅ.क्रांति काटोले,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि.प.यवतमाळ ,जिल्हा कृषी अधिकारी श्री आडे साहेब,तहसीलदार अमित भोईटे, गट विकास अधिकारी श्री.केशव पवार, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती भारती इसळ, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री चित्तरंजन कोल्हे, भोयर मॅडम, माजी सभापती श्री प्रविणभाऊ कोकाटे ,श्री कुणाल भोयर ,श्री मनोज भोयर ,श्री बाळू धुमाळ, श्री संतोष कोकुलवार तसेच तालुक्यातील सरपंच,उपसरपंच सदस्य व नागरिक उपस्थित होते.
पशू प्रदर्शनी ची तांत्रिक बाजू जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाच्या सहायक आयुक्त पशुसंवर्धन डाॅ.अलोणे, डाॅ.नागापुरे,डाॅ.बावणे, डाॅ.तगारे,डाॅ.कदम, व डाॅ.डिडोळकर पशुधन विकास अधिकारी(वि) श्री.सुरेंद्र हाडोळे, पशुधन विकास अधिकारी (गट अ) डॉ.प्रविण वानखडे, डाॅ.अमेय गुप्ते यांनी सांभाळली.
सर्वप्रथम प्रदर्शनाचे उद्घाटन गोमातेचे पूजन करून आदिवासी विकास मंत्री, प्राध्यापक श्री अशोकरावजी उईके सर यांच्या हस्ते करण्यात आले. मंत्री महोदयांनी प्रत्येक गटात जाउन पशु पालकांशी संवाद साधला व पशूंची पाहणी केली. यानंतर काही शेतकऱ्यांना पंचायत समिती कृषी मार्फत मोटार पंप,पाईप व तालुका कृषी मार्फत ट्रॅक्टर वाटप करण्यात आले.
यानंतर बक्षीस वितरण कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रथमतः वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रदर्शनामध्ये २५० हून अधिक विविध गटातील
सहभागी संकरीत वासरे, देशी गायवर्ग, संकरीत गायवर्ग, सुदृढ बैलजोडी, म्हैसवर्ग, शेळी वर्ग, कुक्कुट वर्ग या प्रमाणे आठ गटांमधून २ लाख १८ हजार २०० रुपयांची ८० पारितोषिके देण्यात आली. पशु, पक्षी यांच्यासाठी टेंट, चारा – पाणी आदींची तर पशुपालकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
प्रास्ताविक जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. क्रांती काटोले यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री.सागर विठाळकर यांनी केले.यावेळी गटविकास अधिकारी यांनी कृषी ला पशुसंवर्धनाची जोड देण्याचे आव्हान केले.आदिवासी विकास मंत्री महोदयांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातुन सर्व पशुपालकांचे अभिनंदन केले व त्यांस मार्गदर्शन केले. यावेळी सर्व अधिकारी यांना लाभार्थी योजना पारदर्शक पणे राबवण्याबाबत सूचना केल्या.वर्षाच्या सुरुवातीस योजनांचे वेळापत्रक जाहीर करण्याबाबत सूचना केल्या.यानंतर 2 लाख 18 हजार 200 रुपयांचे विविध गटांच्या 80 लाभार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी बैलजोडी गटात प्रथम बक्षीस कवडू तानबा कुबडे(झाडगाव)यांच्या जोडीस तर द्वितीय-पुंडलिक झाडे यांच्या व तृतीय प्रवीण इंगोले(पिंपरी दु)यांच्या जोडीस मिळाले. म्हैस वर्गाचे प्रथम विनोद पाल यांस तर शेळी गटाचे प्रथम वर्षा सावसाकडे राळेगाव यांस मिळाले. कुक्कुट गटात लोकेश हिवरे रावेरी यांच्या पक्षास सर्वात उत्कृष्ट पक्षी म्हणून प्रथम बक्षीस मिळाले. श्री प्रवीण इंगोले यांनी विविध गटांमध्ये एकूण 5 बक्षिसे मिळवली. सर्व बक्षीस वाटपानंतर सहायक गटविकास अधिकारी श्रीमती इसळ मॅडम यांच्या आभार प्रदर्शनातून कार्यक्रमाची सांगता झाली.
