राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमी शस्त्रपूजन उत्सव, पथसंचलनावर फुलांचा वर्षाव


प्रतिनिधी(प्रवीण जोशी)
ढाणकी…


ढाणकी शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे वतीने विजयादशमी व शस्त्र पूजन उत्सव निमित्याने दिनांक २० ऑक्टोबर रविवार रोजी ठीक पाच वाजता आर्य वैश्य भवन येथून पथसंचलनाला सुरुवात झाली. सुरुवातीला सर्व स्वयंसेवकांनी भगव्या ध्वजाला वंदन करून एक स्वयंसेवक सर्वांच्या अग्रस्थानी होता. दरवर्षी प्रमाणे यावर्षी विजयादशमीच्या निमित्ताने ढाणकी शहरात स्वयंम सेवक संघाच्या वतीने पथसंचलनामध्ये सर्व स्वयंमसेवक हे गणवेशात सहभागी झाले होते. हे संचलन पाहण्यासाठी चौका चौकात गर्दी झाली होती. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून विद्यावाचस्पती प्रा. दिलीप जोशी वाशिम विमर्श विषय प्रमुख विद्याभारती विदर्भ प्रांत हे होते. प्रमुख अतिथी म्हणून कृष्णानंद मुनि अमृते (बाबाजी महानुभाव )श्री दत्त मंदिर टेंभेश्वर ढाणकी हे लाभले होते.
शहरातील मुख्य हनुमान मंदिरापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशा मार्गाने पथसंचलन करण्यात आले. महिला मंडळींनी ठिकठिकाणी रांगोळ्या काढून या पथसंचलनाचे स्वागत केले. हातात दंड योग्य नियोजन अभूतपूर्व शिस्त बघायला मिळाली. स्वयंसेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले. विशेष म्हणजे तरुणांचा मोठा उत्साह यावेळेस दिसून येत होता.
चौकट…
भारतीय संस्कृती ही जगातली उत्तम संस्कृती असून कोणताही सण उत्सव असल्यास दीप प्रज्वलित करून करतात. जो दीप लावलेला असतो तो आपल्याला नेहमीच तिमिराकडून तेजाकडे नेतो. पाश्चात्य संस्कृतीचे अवलोकन केले असल्यास जन्मदिनाच्या दिवशी सुद्धा केक आणून त्यावर कॅण्डल ठेवून साजरा करतात. आणि नंतर ती कॅन्डल विझवली जाते. एवढा फरक पाश्चात्य आणि भारतीय संस्कृतीचा आहे. उत्तम संस्कार नव्या पिढीला माहिती झाले तरच भारतीय संस्कृती टिकेल.हे संस्कार बिंबवण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत आलेला आहे.
विद्यावाचस्पती.प्रा दिलीप जोशी
विमर्श विषय प्रमुख
विद्याभारती विदर्भ प्रांत.