
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
यवतमाळ जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून पार पडत असलेल्या पावसाळी क्रिडा स्पर्धा नुकत्याच तालुका स्तरावर सुरू असून दिनांक 26/9/2023 रोजी पार पडलेल्या 19 वर्षे वयोगटातील मुंलीची कब्बडी स्पर्धा राळेगाव येथील इंदिरा गांधी महाविद्यालयात पार पडली असून अंतिम टप्प्यात फायनलच्या सामन्यात श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झाडगाव येथील विद्यार्थीनी खेळाडूंनी इंदिरा गांधी महाविद्यालयाचा दारूण पराभव करून जिल्ह्यावर आपला प्रवेश निश्चित केला असून दिनांक 27/9/2023 रोजी संपन्न झालेल्या 17 वर्षे वयोगटातील मुलीच्या कबड्डीच्या खेळात वसंत माध्यमिक विद्यालय पिंपळखुटीचा सुद्धा पराभव करून जिल्ह्यावर प्रवेश निश्चित केला असून झाडगाव सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या विद्यालयातील कब्बडीपट्टूंना खूप वर्षांपासून कब्बडी सारख्या खेळात विशेष रस निर्माण करून विद्यालयात कब्बडीमय वातावरण निर्माण करणारे कब्बडीचे अनुभवी श्रावनसिंग वडते सर ,शारिरीक शिक्षक तथा कब्बडीचे कोच मोहन बोरकर सर ,महिला प्रशिक्षक वंदना वाढोणकर, विद्यार्थ्यांच्या खेळात अतिशय मेहनत घेणारे शुभम मेश्राम सर यांनी अथक परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांना जिल्हा स्तरावर खेळण्यासाठी जाण्याची संधी दिल्याबद्दल खेळाडू विद्यार्थ्यांमध्ये व पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले असून या विजयी महिला खेळांडूचे संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, संचालक, प्राचार्य,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनींनी अभिनंदन केले असून यावेळी पार पडलेल्या तालुका स्पर्धेत क्रीडा संयोजक म्हणून प्रफुल्ल खडसे तर क्रीडा अनुभवी विशाल हजारे अतूल मेश्राम,जगताप तर पाहूणे म्हणून प्राचार्य निमसटकर सर उपस्थित होते.त्यावेळी उपस्थित मान्यवरांनी दोन्ही संघांना रितसर विजयी झाल्याचे प्रमाणपत्र देऊन जिल्ह्यावर खेळासाठी शुभेच्छा दिल्या असून आपले खेळाडू जिल्हा स्तरावर सुद्धा विजय प्राप्त करून विभागावर जिल्ह्याचे नेतृत्व करेल असा विश्वास मोहन बोरकर सरांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
