
फुलसावंगी/प्रतिनिधी
आद्य.पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रा.विठ्ठल कांगणे यांचे जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम दि.१४ जानेवारी २०२४ ला स्व.सुधाकरराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयत सकाळी ११ वाजता फुलसावंगी पत्रकार संघा तर्फे आयोजित केला आहे.तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे हे उपस्थित आहेत.राहणार ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना १० वी १२ वी नंतर योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे त्यांना योग्य दिशा मिळत नाही.त्यासाठी परिसरातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी हा प्रबोधन पर कार्यक्रम आयोजित केला.असून परिसरातील विद्यार्थी पालकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन फुलसावंगी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
