

सहसंपादक : रामभाऊ भोयर
जिनींग धारकांची व तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अरेरावी चे किस्से या वर्षी गाजले पन त्यांच्या तक्रारी न झाल्याने अनेक प्रकरणे तिथल्या तिथे दबली. शँकर नानाजी डफ या युवकाला लाथा बुक्यानी मारहाण करण्या पर्यंत मजल गेल्याने शेतकरी वर्गात संतापाची भावना आहे. तशी तक्रार राळेगाव पोलीस स्टेशनंला दाखल झाल्याने प्रकरण समोर आले.
राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष शशिकांत उर्फ बाळू धुमाळ, शिवसेना शहर प्रमुख इम्रान पठाण यांनी या मारहाणीचा निषेध करून इथे जाब विचारला तेव्हा कर्मचारी यांनी नरमाईची भूमिका घेतली खरी, पन आधी त्यांचा तोरा काही और होता अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
स्वामी जिनींग येथे कापसावर पाणी मारणे सुरु होते याचे व्हिडिओ शूटिंग का घेतले असे स्वामी जिनींग च्या कर्मचारी चे मत होते. मात्र कापसावर मुळात जिनिंग वालेच पाणी का मारत असावे ? आणि याचे शूटिंग घेतले तर यांना फरक का पडावा ? अर्थत यात काहीतरी काळेबेरे असावे अशी शक्यता नाकारता येत नाही.
या कारणावरून मारहाण केल्याची तक्रार राळेगाव पोलिसात दाखल झाली आहे. जिनिंग वाल्यांची मगृरी वाढत असल्याच्या प्रतिक्रिया या घटने नंतर उमटू लागल्या आहे. बाहेरून येऊन गावात दादागिरी करू पाहणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिल्या जाईल असा इशारा शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांनी दिला.
