वरोरा मध्ये ईद-मिलादुन्नबीचा जलसा धूमधामात साजरा

प्रतिनिधी :- शारुखखान पठाण, वरोरा, चंद्रपूर

वरोरा : शहरातील संपूर्ण मुस्लिम समुदायाने भाऊचाऱ्याचा संदेश देणाऱ्या ईद-मिलादुन्नबीच्या उत्सवाला मंगळवारी मोठ्या जल्लोषात साजरा केला. यानिमित्ताने नगरातील मुख्य मार्गावर मुस्लिम समुदायाने भव्य शोभायात्रा काढली. यात आकर्षक झांकी प्रमुख आकर्षण ठरल्या. शहरात ठेवलेल्या हिरव्या ध्वजांच्या आणि हातात इस्लामिक झेंडे धरलेल्या मोठ्या आणि विशेषत: लहान लहान मुलांनी जुलूसाची शोभा वाढवली. जुलूसला शहरभर विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले.


प्रेषित मुहम्मद पैगंबर साहेब हे एक अरब नेते आणि इस्लाम धर्माचे संस्थापक होते . पारंपरिक इस्लामच्या धारणेनुसार ते अल्लाहचे अंतिम पैगंबर किंवा प्रेषित होते. इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला, त्यामुळे त्यांना नबी, रसूल इत्यादी नावांनीही संबोधित केले जाते. जगातील एका मोठ्या धर्माचे संस्थापक म्हणून इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. आणि इस्लामी तारखेच्या 12 रबीउल अव्वल च्या दिवशी त्याचा जन्म झाला.

मुस्लिम समाजाने शहरात पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जन्मदिनानिमित्त भव्य जुलूस काढला. मालवीय वॉर्ड, मौलाना आझाद वॉर्ड, कालरी वॉर्ड, कासम पंजा, काजी मोहल्ला परिसरातील लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील जहीरुद्दीन चिश्ती दरगाह परिसरात एकत्र आले. त्यानंतर येथून जुलूस सुरू होऊन सदभावना चौक, माढेली नाका, जयभारतीय चौक, डोंगरवार चौक, मित्र चौक, आझाद वॉर्ड, पटेल चौक, कालरी वॉर्ड, साप्ताहिक मंडी, नेहरू चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे समारोप झाला. जुलूस दरम्यान शहरातील विविध राजकीय संघटना आणि संस्थांनी चौक-चौकात पंडाल लावून जुलूसाचे स्वागत केले तसेच जुलूसात सहभागी झालेल्या वृद्ध, लहान मुलांपासून तरुण सामाजिक कार्यकर्त्यांचे भव्य स्वागत करून त्यांना ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या शुभेच्छा दिल्या. सामाजिक संघटनांनी शरबत, मिठाई आणि लंगरची व्यवस्था केली होती.
त्यावेळी शांतता राखण्यासाठी पोलिस प्रशासनाचे पथक तैनात होते.
या जुलूसाच्या यशात वरोरातील सर्व मुस्लिम संघटनांचे महत्त्वाचे योगदान राहिले. पोलिस प्रशासन आणि वरोरातील नागरिकांचे जश्न-ए-ईद-मिलाद-उन-नबी शहर कमिटीने धन्यवाद दिले, ज्यांनी या जुलूसाला यशस्वी बनवण्यासाठी मदत केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये शब्बीर शेख, मोहसिन रजा पठान, जावेद हबीब शेख, शकील खान, इमरान शेख, शाहरुख शेख,छोटू भाई,जावेद अंसारी. अयूब खान, मम्मू भाई बशीर भाई ( अन्ना ) नसीम कादरी काजी मोहल्ला कमिटी, मौलाना आझाद वॉर्ड कमिटी, कासम पंजा कमिटी, कालरी वॉर्ड, मालवीय वॉर्ड कमिटी व इतर मुस्लिम संघटनांचे पदाधिकारी सदस्य यांचे योगदान होत.