

ज्येष्ठ पत्रकार ,राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे दिल्ली यांच्या मुख्य उपस्थितीत प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन
नागलोक बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्था बोर्डा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती वरोरा च्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
26 नोव्हेंबर रोजी संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देत सकाळी 8 वाजताच्या दरम्यान संविधान सन्मान बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे निखिल राणे आणि संच यांचा भरगच्च सदाबहार भिमगीतांचा जलसा
आयोजित केला आहे . तर सायंकाळी 7 वाजता ज्येष्ठ पत्रकार ,राजकीय विश्लेषक अशोक जी वानखेडे ,दिल्ली यांचे भारतीय संविधानाची जडणघडण व सद्यस्थिती या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे .
तसेच बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्य या विषयावर दोन गटात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .सायंकाळी 7 वाजता शिवशाहीर भगवानदादा गावंडे अकोला यांचा संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय भरगच्च कार्यक्रमाचा जास्तीत जास्त प्रमाणात सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन नागलोक बहुउद्देशीय संस्था वरोरा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती वरोरा यांच्या वतीने वरोरा वासीयाना केले आहे.
