
मोहदा वन परिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या राळेगाव तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी वाघाने हल्ला केला असून यात सराटी येथील गाईचा पडशा पाडला असून ठार मारली तर वेडशी येथील निलेश निमरड यांची गाय गंभीर जखमी केली आहे. मोहदा वनपरिक्षेत्रातील परिसरामध्ये वाघाचा मुक्त संचार वाढला असून सोमवारी एक घटना दिवसा व एक घटना रात्री दरम्यान घडली यात वाघाने एका गाईला ठार केले तर एक गंभीर जखमी केली.
वेडशी व सराटी गावाला लागून मोहदा वनपरिक्षेत्र आहे या जंगल भागामध्ये काल सोमवार ला गुरे जनावरे चराईसाठी गेले असता दुपारच्या सुमारास अचानक वाघाने गाईवर हल्ला केला.यात वेडशी येथील निलेश निमरड यांची गाय गंभीर जखमी झाली असून डॉक्टर निखिल उगे यांनी गाईवर उपचार केल्याचे सांगितले व सराटी येथील गाईवर रात्री हल्ला केला असून तिला ठार मारून टाकले
परिसरामध्ये वाघ आला पळा पळा अशी गत झाली असून शेतातील मजूरानेही वाघ पाहिला असल्याचे यावेळी सांगितले याबाबत वनविभागाने परिसरामध्ये दवंडी द्वारे वाघाची माहिती दिली असून काही सूचना केल्या आहे. ग्रामपंचायत ला पत्र दिले असून यामध्ये जंगल परिसरामध्ये शेतकरी शेतमजूरांनी सतर्क राहने शेतामध्ये एकटे न जाता समूहाणे शेतामध्ये काम करणे अश्या एक ना अनेक वाघापासून बचावासाठी ग्रामपंचायत मार्फत गावामध्ये माहिती दिली असून यामुळे शेतकरी व मजूर भयभीत झाला असून दहशतीत शेतातील कामे करत आहे.
वाघ व बिबट झाला वन विभागाच्या कॅमेऱ्यात ट्रॅप
परिसरातील जंगला मध्ये वाघ व बिबट वन विभागाच्या कॅमेऱ्यात ट्रॅप झाली असल्याची ही माहिती संबंधित विभागाकडून अधिकृत मिळाली आहे
