
व्यसनापासून दूर राहा ह.भ.प.बाळू महाराज डाके यांचे तरुणांना आव्हान
माहागाव प्रतिनिधी:- संजय जाधव
महागाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या तालुक्यातील फुलसावंगी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक 8 डिसेंबर ते 15 डिसेंबर संगीतमय भागवत सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे किर्तन, श्रीमद् भागवत कथा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सह विविध धार्मिक कार्यक्रम आहेत. सकल संतांच्या कृपाशीर्वादाने व संपूर्ण ग्रामस्थांच्या सहकार्याने गेल्या 28 वर्षापासून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताहाची आजही म्हणजेच 28 व्या वर्षात पदार्पण झाले. अतिशय भक्तिमय वातावरणात
8 डिसेंबर पासून सप्ताहाचा प्रारंभ झाला आहे . या सप्ताह मध्ये कथा प्रवक्ता ह .भ.प .विवेक महाराज व्यास आळंदीकर संगीत अलंकार यांचे अमृततुल्य अमृतवाणीतून भागवत कथा संपन्न होणार आहे. तसेच हभप आशोक माहाराज थोरात अमडापूरकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होत आहे. या सप्ताहात महाराष्ट्रातील विद्वान नामवंत महाराजांचे कीर्तन रोज रात्री 9ते 11 यावेळेस संपन्न होणार आहेत यामध्ये ह .भ .प बाळू माहाराज डाके भिकाजी महाराज वारकरी शिक्षण संस्था सेलू ,आनंदराव माहाराज, संस्कार माहाराज, शरद महाराज, पवन माहाराज, माऊली माहाराज धर्मचार्य नारायन माहाराज
यांच्यासह शेवटी ह भ प व्यसनमुक्ती सम्राट मधुकर बाबा खोडे महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. या सप्ताहात15 डिसेंबर 2023 रोजी भव्य दिव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेल आहे यासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहात मोठ्या प्रमाणात अन्नदान होणार आहे. यासप्ताहात तरी या संपन्न होत असलेल्या भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा अशी विनंती समस्त गावकरी मंडळी फूलसावंगी यांच्यावतीने करण्यात आली आहे.
