ढाणकी:अखिल हिंदू संघटन तर्फे महाआरतीचे आयोजन.


प्रतिनिधी (प्रवीण जोशी) ढाणकी

छत्रपती शिवाजी महाराज एक महान भारतीय राजे होते शिवाय एक उत्कृष्ट शासक म्हणून त्यांच्या तत्कालीन काळात सुद्धा प्रचंड दबदबा होता हे विशेष बाब होय ते भारताला लाभलेले महान व शिस्तप्रिय शासक होते. शिवाजी महाराजांमध्ये देशासाठी असलेले प्रेम आणि कठीन प्रसंगातून बाहेर येण्याचे ध्येय अतुलनीय आणि प्रेरणादायी आहे शिवाय हे त्रिकाल बाह्य धगधगते वास्तवच आहे. आज इतके वर्ष होऊन गेली पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी लढविलेल्या लढायाची आजही चर्चा होते. स्वराज्य निर्माण करण्याची ओढ होती. महाराजांनी हिंदू धर्म, पुराणाचे आणि देवळाचे रक्षण केले. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यामुळे त्यांची भारतभर नवे तर सर्व जगभर कीर्ती आहे. ढाणकी येथील अखिल हिंदू संघटन या तरुणांनी अनेक उपक्रम हाती घेतले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना नियमित न चुकता रोज पुष्पहार अर्पण करण्याचे आयोजन करण्यात येत आहे अशा विविध कार्यक्रमामुळे किशोर वयीन असलेल्या मुलांना संस्कृतीची दर्शन घडेल. आज पुष्पहार अर्पण करण्याचे १०१ दिवस पूर्ण झाले. त्या अनुषंगाने आज छत्रपती शिवाजी चौक व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हजारोंच्या संख्येने तरुण उपस्थित होते. तिथे छत्रपती शिवाजी महाराज , भारत मातेची आरती व ध्येय मंत्र म्हणण्यात आले. एरवी नेते मंडळी किंवा गावातील मंडळी जयंती पुण्यतिथीला किंवा निवडणुकीच्या काळातच महापुरुषांना पूजतात व हार अर्पण करतात. परंतु या तरुनानी न चुकता आज १०१ दिवस झाले हार अर्पण करण्याचे कार्य हाती घेतले. त्याचबरोबर त्याचबरोबर हा उपक्रम आजूबाजूच्या गावात राबविल्या जात आहे. सर्वत्र आजूबाजूच्या गावात नित्यनेमाने छत्रपती शिवाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना हार घातला जात आहे. व हनुमान मंदिर येथे आरती व हनुमान चालीसा पठण करण्यात येत आहे. यामुळे गावातील नागरिकांकडून व आजूबाजूच्या गावातून या तरुणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.