

उमरखेड तालुका प्रतिनिधी=-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण)पत्रकार
मो. 7875525877
दिनांक 16.8.2025रोजी निंगनूर येथे मूसळधार पाण्या मुळे शेतकरीचे भरपूर नुकसान झाले नदी नाल्या काठचे घर सर्व पाण्यामध्ये बुडाले आहे . नदीनाल्या काठच्या लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने अनधान्य चे भरपूर नुकसान झाले .यात कोणतीही जीवितहानी झाली नाही . सरपंच सुरेश वि. बरडे यांनी पूर ग्रस्ताच्या घरी जाऊन पाहणी केली . माजी सरपंच बालाजी महाले इम्रान खान , वलीउल्हा खान , अंकुश विक्रम राठोड, विलास तुळशीराम राठोड व अनेक शेतकरी उपस्थित राहून नागेशवाडी येथील दोन्ही बाजूने पाहिले असता पूर्ण 100/टक्के नुकसान झाले आहे. तरी तात्काळ तहसिलदार साहेबानी तलाठी यांना तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
