
पोलीस विभागाच्या सुस्त धोरणामुळे कायदा सुव्यस्थेचे धिंडवडे
वणी :- येथील पोलीस स्टेशन सुस्तवलेल्या कारभारामुळे कायदा व सुव्यवसंस्थेचे धिंडवडे निघत असून शहरी भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे राजरोजपणे सुरु असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष दिलीप भोयर यांनी निवेदनातून केला आहे.
तसेच मागील काही महिन्यांपासून चोरी व दरोड्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.परंतु पोलिस प्रशासनाला दरोडेखोरांना शोधण्यात अपयश आले आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा शहरात मोठ्या प्रमाणात हौदोस वाढला आहे. दिवसा ढवळ्या बॅग लंपास करणे, घर फोडणे, दरोडा टाकणे, दुकाण फोडुन चोरी करने व आग लावुन देणे, तसेच लालपुलीया परिसरात कोळसा चोरी करने, भंगार चोरने, वाहणाच्या बॅटऱ्या चोरने, वाहण चोरने, असे अनेक गुन्हे वाढले असुन अनेक गुन्ह्याचे तपास प्रलंबित आहे. त्यामुळे चोरी करणा-यांचे मनसुबे प्रचंड वाढले आहे. त्यामुळे पोलीसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण झाला आहे. वणी परीसर कोळशाची मोठी बाजारपेठ म्हणुन प्रसिध्द असल्याने या ठिकाणी अनेक राज्यातील ‘लोक वास्तव्यास असुन या पैकी अनेक जन गुन्हेगारी क्षेत्रातील देखील आहे. वणी शहर हे जिल्यातुन दुस-या क्रमांकाचे शहर असुन वणी पोलीसांच्या हातात लाखो लोकांच्या सुरक्षतेची व त्यांच्या संपत्तीचे जतन करण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे या ठिकाणी कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचा-यांची गरज असुन येथिल पोलीस विभाग हा सुस्तावला आहे. अनेक कर्मचारी केवळ अवैध व्यवसायीकांकडुन चिरीमिरी घेण्यातच व्यस्त राहत असल्याचे आरोप सामान्य नागरीक बोलुन दाखवत आहे. त्यामुळे पोलीस यंत्रनेला तात्काळ कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कामी लावावे सोबतच कर्तव्यदक्ष अधिकारी नेमण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.शहरात जनमानसात मोठ्या प्रमाणात असुरक्षतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सुरक्षीततेची हमी बहाल करुन पोलीस स्टेशन वणी यांच्या कार्यप्रणालीची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनातून वंचित बहुजन आघाडीने केली आहे.यावेळी तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांचे नेतृत्वात मंगल तेलंग, किशोर मुन,नरेंद्र लोणारे,किर्ती लभाने,सुधाकर भागवत,मिलिंद पाटीलसह कार्यकर्तांनी केली आहे.
शहरात मटक्याच्या धंद्यात वाढ
शहरात विविध भागात वरली मटक्याची दुकाने थाटल्या गेली असून राजरोसपणे खुलेआम मटक्याच्या पावत्या फडल्या जात आहे. तर अंदर बाहर पासून सर्वच अवैध व्यवसाय सुरू झाल्यामुळे साहेबांनी सुद्धा हिरवा कंदील तर दाखविला नाही ना अशी शंका जनसामान्यातुन निर्माण होत आहे.
