राळेगांव तालूक्यात धुव्वाधार पाऊस :-शेतकऱ्यांचे नुकसान जनजीवन विस्कळीत

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यात मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या धुवाधार पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले व शेतीच्या कामाला काही प्रमाणात ब्रेक बसला आहे सतत धार पावसाने बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहे तर राळेगाव शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील वारा आष्टा गावाचा संपर्कही दोन दिवस तुटला होता . सद्द स्तिथीत पाऊस थांबला आहे .पावसाच्या येण्याने शिवार हिरवागार झाला आहे. दिनांक २०,२१जुलैला झालेल्या धुव्वाधार पावसाने सुखावला असला तरी तालुक्यातील नद्या नाले भरून वाहायला लागले आहे छोटे नाले तर तुडुंब भरून वाहत होते रावेरी राळेगाव क्षेत्रात असणाऱ्या शेतांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले प्रकाश मेहता यांच्या शेतात उन्हाळ्यात घातलेला बांध पावसाच्या तडाख्याने फुटला व शेतातील पिकासह मातीही वाहून गेली त्यांच्या तीन एकरातील शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. व लाख रुपयांचा बांधही वाहून गेला या त्यांचे मोठे नुकसान झाले. कोतुर्ली शिवराय गोपाल नगर परिसरात झालेल्या धुवाधार पावसाने रस्ते खरडून गेले. तर शेतातील पीकही खरडून गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले काही शेत जमिनी आजूबाजूच्या नाल्याच्या पावसाने जमिनी पाण्याखाली आल्या त्यामुळे शेतातील कामे पूर्णता बंद ठेवावी लागते.

गुजरी गावाच्या बाजूने वाहत येणारा एक नाला जो वाराष्ट्राया रस्त्याने येतो तो पावसाने तुडुंब भरत वाहत आल्याने राळेगाव वारा आष्टा या गावातील शेतकऱ्यांच्या शेतात आणि घुसले व शेतीची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याचप्रमाणे वारा व आष्टा या दोन गावाचा संपर्क दिवसभर तुटला होता वाऱ्यातील राळेगाव ला येणारे विद्यार्थी हे गावात परतू शकले नाही काही नातेवाईकाकडे तर काही विठ्ठल मंदिरात त्यांची व्यवस्था करण्यात आली होती वारा या गावाला जाताना छोट्या नाल्यावरील पूल हे जुने झाले असून त्यांना पुनर्रचित करून त्याची उंची वाढवून नवीन पूल बांधून देण्याची मागणी वारा येथील ग्रामपंचायत सदस्य धवल घुंगरूळ व सरपंच दत्ता घोटेकर यांनी आमदार प्रा डॉ अशोक उईके व प्रशासनाकडे केली आहे पावसाळा आला की वारा आणि आष्टा व इचोरा या गावांचा प्रश्न अहिरणीवर येतो वारा आष्टा ईचोरा या गावाला वर्धा नदीचे मोठे पात्र लागले आहे वर्धा तुडुंब भरली की बाकीच्या छोट्या नद्या नाले यांचे पाणी थांबून जात ते या गावांमध्ये व शेतामध्ये पाणी शिरते व गावाकडे जाण्याचे रस्ते पूर्णतः बंद होते यामुळे प्रशासनाने या गावांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आष्टा इचोरा या गावांना तर पूर परिस्थितीत जायला मार्गही नाही आजूबाजूंनी पाण्याचा वेढा पडतो पाण्याची पातळी वाढली की ईचोरा येथील लोकांना कॅनलच्या रस्त्याने पळ काढावा लागतो परंतु दुसरा कुठलाही मार्ग यांच्याजवळ राहत नाही सावरगावच्या दिशेने या लोकांना पळ काढावा लागतो हे प्रश्न कधी सुटेल याकडेही प्रशासन कधी लक्ष देईल हे महत्त्वाचा प्रश्न आहे सद्यस्थितीत पाऊस थांबला आहे शेतकऱ्यांच्या कामाला थोडासा ब्रेक अति पावसाने बसला आहे. तालुक्यात आष्टोना जवळील नाल्यात दुचाकी स्वार पडले परंतु कुठलीही जीवितहानी झाली नाही याव्यतिरिक्त तालुक्यात कुठेही जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या नाही सद्यस्थितीत पावसाचा जोर कमी असला तरी वर्धा मात्र वर्धा नदी मात्र दुथडी भरून वाहत आहे तिचा पूर पाहण्यासाठी राळेगाव शहरातील आजूबाजूच्या लोकांनी रामतीर्थ कापसी कडे धाव घेतली आहे.