
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
:– देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी केलेल्या बेताल वक्तव्याबद्दल राळेगाव येथे दिं १७ डिसेंबर २०२२ रोज शनिवारला भाजप कार्यालया समोर भाजपच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला असून पाकिस्तानचा झेंडा आणि बिलावल भुट्टोच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताला एक समृद्ध, संपन्न आणि शक्तिशाली राष्ट्र म्हणून जागतिक पटलावर पुढे घेऊन जात आहेत. जगभरातील अनेक राष्ट्रप्रमुख आणि आंतरराष्ट्रीय संस्था मोदीजींची धोरणे, योजना आणि ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या मंत्राची प्रशंसा करत आहेत. भारत ही जगातील सर्वांत वेगाने
वाढणारी अर्थव्यवस्था आहे. अनेक संकटे असूनही आर्थिक व्यवस्थापन सर्वोत्तम ठरले आहे. नुकतेच भारताला जी-२० चे यजमानपद मिळाले. याच नैराश्यातून पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी न्यूयॉर्कमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदी यांच्यावर आक्षेपार्ह स्वरूपाची टीका केली. या वक्तव्याचा शनिवारी भाजपाच्या कार्यालया समोर निषेध नोंदविण्यात आला असून यावेळी संतप्त पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बिलावल भुट्टोंची प्रतीकात्मक प्रतिमा जाळण्यात आली असून नरेंद्र मोदी जिंदाबाद बिलावल भुट्टो मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या असून तीव्र निषेध करण्यात आला यावेळी आमदार प्रा.अशोक उईके, तालुकाध्यक्ष चित्तरंजन कोल्हे, शहराध्यक्ष डॉ कुणाल भोयर, माजी नगराध्यक्ष बबन भोंगारे, प्रकाश पाल, गजानन निमट, अभिजीत कदम, डॉ भीमराव कोकरे, गोविंद डोंगरे, अनिल नंदुरकर, शारदानंद जयस्वाल, रंजीत ठाकरे, सुनील जिड्डेवार, किशोर जुनूनकर ,छायाताई पिंपरे, सविता पोटदुखे, विजय येनोरकर,विशाल पंढरपुरे,आशिष इंगोले,संदीप तेलंगे,दिनेश गोहणे,शुभम मुके,सागर वर्मा प्रफुल कोल्हे,सागर येंबडवार,महादेव टेकाम,सौरभ खड्स्कर आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
