हिरवे स्वप्न साकारण्यासाठी पिवळ्या दागिन्याची मोड खरीप हंगामात सोन्या-चांदी मोडीचे प्रमाण वाढले ,नवी आशा नवी उमेद यंदा तरी निसर्गराजा साथ दे

सहसंपादक : रामभाऊ भोयर

यवतमाळ जिल्हा हा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो या जिल्यातील राळेगाव तालुक्यात कापूस पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते त्यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असून हा हंगाम हिरवे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी शेतकरी कुटुंबातील महिला चक्क अंगावरचे दागिने मोडून टाकतात तसेच चित्र यंदाही कायम असून सोन्या-चांदीच्या खरेदीच्या दुकानात बळीराजा बी बियाणे खाते खरेदीसाठी आपल्या पत्नीच्या अंगावरील दागिन्याची मोड करताना दिसून येत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका आदिवासी बहुल भाग असून या तालुक्यात कोणतेही मोठे उद्योगधंदे किंवा कारखाने नाहीत त्यामुळे येतील व्यवसाय हा शेतीच असून विशेषता खरीप हंगामावर सर्व शेतकऱ्यांचे पुढील वर्षाचे अर्थ चक्र विसंगून असते या हंगामात पेरणीला लायक असलेले एकरभरही क्षेत्र पेरणी विन रिक्त ठेवले जात नाही मात्र पूर परिस्थिती उद्भवण्यासह अतिवृष्टी होऊन शेत जमीन खरडून जाणे पेरणी झाल्यानंतर पावसाने दीर्घ दडी मारणे किंवा अधिक पाण्याने जमीन चिभडूनण पेरणी उलटणे पुराचे पाणी शेतात शिरून पेरलेले किंवा अंकुरलेले बियाणे वाहून जाणे आदी स्वरूपातील संकटे देखील याच हंगामात शेतकऱ्यांसमक्ष उभे ठाकतात यावर्षी देखील अशा संकटाने तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या तोंडचा घास अक्षरशा हिरावून घेतला होता तसेच सोयाबीन पीक फुलोऱ्यावर असताना सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाला होता त्यामुळे तालुक्यात सोयाबीन। पाठोपाठ कापूस उत्पादनातही लक्षणे घट झाली होती अशाही बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांनी हिम्मत सोडलेली नाही आर्थिक अडचणीवर मात करून पुन्हा एक वेळा ते यंदाच्या खरीप हंगामासाठी सज्ज झाले आहेत त्याचे मनोबल वाढविण्याकरिता तथा आर्थिक संकटात सदैव साथ देण्याचे जणू वचन देत शेतकऱ्यांच्या बायका अंगावरील दागिने मोडून मदतीला पुन्हा एकदा सक्षम पणे पुढे आल्याचे चित्र दिसून येत आहेत त्यामुळे शेतकरी सध्या बी बियाणे खाते खरेदी करताना दिसून येत आहेत मात्र पेरणीला एकही दमदार पाऊस झाला नसल्याने शेतकरी पावसाची वाट पाहू लागले आहे.

सोने गहाण ठेवण्यासाठी सोने दुकान दाराकडे तर काहींची बँकेकडे धाव
खरिपातील पेरणी वेळेत साधता यावी यासाठी आवश्यक असलेल्या सर्व साहित्याची जुळवा जुळव शेतकरी कुटुंबाकडून केली जात आहे खर्चासाठी पैसा हाती असावा याकरिता अनेकांनी सोन्याच्या दुकानात तर काहींनी बँकेकडे धाव घेतल्याचे दिसून येत आहे.