पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान बनवण्याकरिता महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या: देवेंद्र फडणवीस यांचे आव्हान

सहसंपादक : रामभाऊ भोयर

यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्राच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा संपन्न झाली या प्रचार सभेत इंडिया आघाडीवर त्यांनी टीका केली व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा पुनरुच्चार केला राळेगाव विधानसभा मतदारसंघात सीता मातेचे एकमेव मंदिर रावेरी असून अयोध्यात रामाच्या मंदिराचा जिर्णोद्धार झाला त्याच धर्तीवर राळेगाव जवळील रावेरी या गावातील देशातील एकमेव सीता मंदिराचा जीर्णोद्धार केला जाईल त्याकरिता राजश्री पाटील हा पुढाकार घेतील असे मत त्यांनी व्यक्त केली इंडिया आघाडीचे नेतृत्व करणारे शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटले की शरद पवार यांचा मंदिराशी काहीही संबंध नाही कारण अयोध्या मध्ये राम लल्ला एकटाच का असे त्यांनी टीका केली त्यांच्यासोबत सीतामाता का नाही अशी विचारणा शरद पवार यांनी केली त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की अयोध्यातील रामलला हे ही मूर्ती राम लल्लाची बालपणाची मूर्ती आहे बालपणी कधी विवाह होत असतो का? एवढीही कल्पना शरद पवार साहेबांना नाही. उद्या रावेरी येथे सीता मातेची मूर्ती स्थापन झाल्यानंतर त्यांनी असे म्हणू नये की इथे राम नाही अशी निष्क्रिय टीका त्यांनी केली तर या भागात कापूस सोयाबीन मोठ्या प्रमाणात उत्पन्न होते कापसाचा शोध येथे कळंब येथे लागला कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जरी भाव कमी मिळाला असला तरी या मागची परिस्थिती लक्षात घेऊन येत्या काळात सोयाबीन कापसामधील तफावत असलेली रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. राजश्री पाटील ह्या बाहेरच्या नसून त्या यवतमाळ जिल्ह्यातील माहेरच्या आहे आणि नेहमी माहेरवाशी यांचे लक्ष आपल्या माहेरवाल्याकडे अधिक असते त्यामुळे त्यांना प्रचंड बहुमताने निवडून पाठवा अशी विनंती याप्रसंगी केली, पुढील कार्यकाळ हा महिला बचत गटाचा राहील. महिलांचे बचत गट अधिक सक्षम करण्याकरिता देशातील 31 कोटी महिलांना उद्योजक बनवण्याचे स्वप्न मोदी सरकारने साकारले आहे देशातील सर्वात महत्त्वाच्या ठिकाणी जसे रेल्वे टेशन एसटी स्टँड व महत्त्वाच्या ठिकाणी महिलांच्या बचत गटांना उद्योग करण्याकरता संधी दिला जाणार आहे. 2029 पर्यंत लोकसभा विधानसभा ठिकाणी महिला 33% दिसतील महिलांना राजकीय वारसा उपलब्ध करून देणे हे मोदी सरकारचे प्रथम कर्तव्य असून येणाऱ्या पुढील पाच वर्षानंतर आपल्याला या विधानसभा व लोकसभा मतदारसंघात महिलांना 33 टक्के आरक्षण देऊन महिलांना राजकारणात समान संधी देण्याचे काम मोदी सरकार करणार आहे केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा त्यांनी उच्चार या ठिकाणी प्रसंगी केला, मोदींमुळे कोरोना काळात देशवासीयांच्याचे प्राण वाचले कोविड काळात भारताची लोकसंख्या पाहता जगामध्ये इतक्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशात लोक मरतील लोकांचे प्राण जातील अशा प्रकारची काळजी इतर देशांना होती मात्र मोदी सरकारने 125 कोटींना तब्बल दोन कोविड चे डोज देऊन त्यांचे प्राण वाचवले केंद्र सरकारच्या व मोदी सरकारच्या अथक प्रयत्नामुळेच आम्हा भारतीयांचे प्राण वाचले असेही त्यांनी सांगितले, पुढील काळात मोदींची नेतृत्व हे देशाला कसे आवश्यक आहे त्याकरता 400 खासदार निवडून येतील अशा आशयात त्यांनी याप्रसंगी आपले मत व्यक्त केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागाचे आमदार डॉक्टर अशोक उईके यांनी केले आपल्या मतदारसंघात 132 केवी विद्युत केंद्र उपलब्ध करून दिले वडकी येथे ग्रामीण रुग्णालय स्थापन करून दिले सूतगिरणीचा प्रश्न हा विरोधकांनी हाणून पाडला या विभागातील बेरोजगारांना आम्ही बिरसा मुंडा आदिवासी सहकारी सूतगिरणी स्थापन करण्याचा प्रयत्न केला यामुळे हजारो युवकांना रोजगार मिळणार होता परंतु विरोधी लोकांना हे पटले नाही व जाणून बुजून त्यांनी हा प्रश्न न्यायालयीन करून दाखला परंतु न्यायालयाचा निकाल लागताच येथे सूतगिरणी उपलब्ध होईल असे आश्वासन याप्रसंगी दिले व त्यांनी राजश्री पाटील यांना प्रचंड मताने निवडून द्यावे अशी विनंती याप्रसंगी केली. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही याप्रसंगी महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे अशी विनंती याप्रसंगी केली महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी येथील सीतामातेचा मंदिराचा जिर्णोद्धार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही त्याकरिता मला प्रचंड बताने निवडून पाठवा अशी विनंती केली माझे मत हे माझे मत नसून ते मोदी सरकारला दिले जाणारे मत आहे मी बाहेरची नसून आपल्याच जिल्ह्यातील आहे आपली मुलगी आहे या देशाला पंतप्रधान मोदी सारखं नेतृत्व आवश्यक असल्याने आपण मला प्रचंड बहुताने निवडून द्यावे अशी विनंती त्यांनी केली व्यासपीठावर उद्योग मंत्री उदय सावंत आमदार संदीप धुर्वे, आमदार रामदास ससाणे ,खासदार हेमंत पाटील ,रमेश अग्रवाल, वसंत घूईखेडकर, नरेंद्र बोर्डे ,हरिहर लिंगनवार, पराग पिंगळे, देवा चव्हाण ,राजू उंबरकर, प्रीती काकडे, चित्तरंजन कोल्हे ,प्रफुल्ल चौहान ,मनोज भोयर ,डॉ कुणाल भोयर ,संतोष कोकुलवार ,किशोर जुनुनकर व स्थानिक कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन स्वप्निल राऊत यांनी केले