
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथे सर्व रोग निदान शिबिर संपन्न सविस्तर वृत्त असे वाढोणा बाजार येथील समाज सेवक तथा माजी उपसरपंच प्रकाश पोपट व वरध जिल्हा परिषद मतदार संघाचे भावी जि. प. सदस्य अरविंद वाढोणकर व समाज सेवक शरल्ली बापु लालाणी यांच्या पुढाकाराने १० नोव्हेंबर रोजी सर्व रोग निदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. सदर अॅक्शन फाॉरफुट फाॉण्डेशन ( अहमदनगर), यवतमाळ अॅफो, B C I ग्रामपंचायत वाढोणा बाजार व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने १० नोव्हेंबर रोजी सर्व रोग निदान शिबिर जिल्हा परिषद शाळेमध्ये घेण्यात आले होते सदर या सर्व रोग निदान शिबिरा मध्ये रक्तदान, मोतीं बिंदू , हायड्रोसील,हरनिया, अंगावरील गाठी,पोटाचे आजार, स्त्रियांचे मासीक पाळी चे आजार, संदी वात, हाडांचे आजार, चर्म रोग, या सर्व आजारांवर मोफत तपासणी करून उपचार करण्यात आले आहेत तर या शिबिरात परिसरात २० गावांमधून ४५० नागरिकांनी मोफत तपासणी करून उपचार करून घेतले आहे.सदर या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सरपंच सौ. जयश्री ताई मांडवकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच योगेश देवतळे, प्रकाश पोपट, शरल्ली बापु लालाणी, अरविंद वाढोणकर, मुन्ना बापु लालाणी, ग्रा.प. सदस्य दिनेश ठाकरे, विजय कन्नाके, विनोद मांडवकर,राजू आडे, हे होते तर अॅफोज राज्य प्रकल्प व्यवस्थापन डॉ मिलिंद साबळे, नंदकिशोर डेहनकर, चवळे,सिरभाते मॅडम, डॉ सुतीका मॅडम व त्यांचे सहकारी यांनी या आरोग्य शिबीरात येवून रुग्णांना मोफत सेवा दिली आहे.सदर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅफोज कृषी मित्र ज्ञानेश्वर बावणे, यांनी केले सदर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चिंतामण टेकाम, निखिल इंगोले, राजकुमार बेताल,राजू वानखेडे, भगवान डोफे, देवेंद्र निकुडे,रजींत कन्नाके, आशिष काळेकर, वृषभ दारुंडे ,प्रविण चिडे, अश्विनी ठुंमणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
