
सहसंपादक: रामभाऊ भोयर
यवतमाळ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व स्व राजीव गांधी तालुका क्रीडा संकुल राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राळेगाव येथे टेनिस हॉलीबॉल अमरावती विभागीय स्पर्धेचे आयोजन दिनांक २१ मे २०२३ ला करण्यात आले होते यामध्ये अमरावती विभागातील संघ सहभागी झाले होते त्यामध्ये १४ वर्षाखालील मुला मुलींच्या संघात न्यूइंग्लिश हायस्कूल राळेगाव व नवोदय क्रीडा मंडळाचा संघ विजयी झाला असुन १७ वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत स्कूल ऑफ ब्रिलियंट व नवोदय क्रीडा मंडळाचा संघ विजयी झाला असुन हे विजयी संघ आता अमरावती विभागीचे नेतृत्व करत राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत व विजयी संघाला नवोदय क्रीडा मंडळाचे प्रमुख महेश भोयर यांनी शुभेच्छा दिल्या आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत अमरावती विभागातीचे नेतृत्व करणारे १४ वर्षाआतील वयोगटात विजयी संघात न्यू इंग्लिश हायस्कूलचे मुले
निसर्ग विनोद ताकसांडे,वेदांत प्रवीणकुमार बोदडे, मंथन गणेश ठाकरे नैतिक पांडुरंग चौधरी,सविधान अनिल हिवरकर,सुजल नितीन कांबळे व मुली मध्ये राधिका अनिल फरकाडे, उन्नती विजय झाडे, आयुषी मदन पाटील, सुहानी दिलीप लांभाडे, प्रेमता सुरेश शेलवटे, तनिष्का मंगेश बोबडे व तेजस्वी विनोद झामरे हे असून १७ वर्षाआतील वयोगटात विजयी संघात स्कूल ऑफ ब्रिलियंटचे राळेगाव मुले अथर्व दत्तात्रय मालधुरे,क्रिष्णा गणेश खेडेकर,रोहित राहुल वनकर,योगेश योगेश वैद्य ओम धनराज शेगेकर व प्रथमेश उमेश केवटे हे आहे व १७वर्षा आतील वयोगटात मिक्स डबल विजयी झालेल्या संघात हिमांशू गणेश ठाकरे व आचल गजानन झाडे आहे या टेनिस हॉलीबॉल विभागीय स्पर्धेचे आयोजन नवोदय क्रीडा मंडळ राळेगाव यांनी केले होते यावेळी तालुका क्रीडा अधिकारी सचिन मिलमिले ,यवतमाळ जिल्हा टेनिस हॉलीबॉल संघटनेचे सचिव अभय धोबे तालुका संयोजक प्रफुल्ल खडसे नवोदय क्रीडा मंडळाचे प्रमुख महेश भोयर, नरेश दुर्गे, गणेश काळे, अतुल मेश्राम, सोनु खान. सचिन डोंगरे, अंकित क्षिरसागर, मोनु खान, सूरज भगत, महेश राजकोल्हे, सुरज उजवणे, मयुरी चौधरी व नवोदय क्रीडा मंडळाचे खेळाडू उपस्थित होते. विषेश म्हणजे हे सर्व खेळाडू राळेगाव येथील नवोदय क्रीडा मंडळाचे खेळाडू असून नवोदय क्रीडा मंडळाच्या वरिष्ठ खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.
