
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव येथील नगरपंचायत ची स्थापना झाल्यापासून मागील सहा वर्षात दहा वेळा मुख्याधिकारी बदलले असून अकरावे मुख्याधिकारी म्हणून घाटंजी येथील मुख्याधिकारी यांच्याकडे प्रभार सोपविण्यात आला असून नगरपंचायतला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने नगरपंचायत ची कामे हवेत असल्याचे चित्र आहे त्याकरिता राळेगाव नगरपंचायतीला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळण्यात यावा यासाठी राळेगाव येथील तालुका शिवसेनेच्या वतीने खासदार भावनाताई गवळी यांना दिं ३१ डिसेंबर २०२२ रोज शनिवारला निवेदन देण्यात आले.
नगरपंचायत क्षेत्रातील सर्वांगीण विकास घडवून आणायचा असल्यास पूर्णवेळ मुख्याधिकारी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी असणे आवश्यक असते परंतु राळेगाव नगरपंचायत ला दोन-तीन वर्षापासून प्रभारी मुख्याधिकारी असल्याने विकास कामांना खीळ बसली आहे तसेच जनतेची अनेक कामे थांबली आहे . घरकुल , शहर स्वच्छता अशी अनेक कामे थांबली आहे त्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असे अनेक प्रश्न राळेगाव शहरात हा वासून उभे असताना या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन राळेगाव नगरपंचायत ला कायमस्वरुपी निवासी मुख्याधिकारी द्यावा अशा मागणीचे निवेदन शिवसेना राळेगाव कडून माननिय खासदार भावनाताई गवळी यांना देण्यात आले आहे.
खासदार भावनताई गवळी
यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सर्वतोपरी तोडगा काढून कायमस्वरूपी मुख्य अधिकारी देण्यात येईल असे आश्वासन माननिय खासदार भावनाताई गवळी यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे
निवेदन देतेवेळी शिवसेना तालुकाप्रमुख विनोद काकडे , शहरप्रमुख राकेश राउळकर ,शंकर गायधने , धनराजजी श्रीरामे इमरान पठाण शहर संघटक, योगेश मलोन्डे युवासेना शहरप्रमुख, सुनिल शिरसागर व्यापारी सेना शहर प्रमुख ,उपशहरप्रमुख महेन्द्र तुमाने , सुनिल सावरकर , दिपक येवले . विद्यार्थी सेना शहरप्रमुख रोशन इरपते, मनोज राउत, मनोज वाकुलकर विभाग प्रमुघ विजय शेन्डे उपसरपंच वर्णा, लताताई भोयर महिला सेना शहरप्रमुख , असंख्य शिवसैनिक उपस्थित होते .
