
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वडकी येथील राधाकृष्ण नगरीमध्ये आज दिनांक 7/9/2023 रोज गुरूवारला श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला.यावेळी भजन,सोबतच नगरीतील तरूण, वयोवृद्ध महिला,तरूणी सर्व कृष्ण भक्तांनी नाचून गाऊन उत्सवाची सुरुवात केली.नंतर अभंग गाऊन या उत्सवाला विशेष रूप धारण करण्यात आले होते.या नंतर जन्माचा महिमा सांगितला.सोबतच प्रचंड उत्साहात गरबा,व नृत्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी हरिनामाच्या गजरात काल्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपन्न झाला.त्यावेळी राधाकृष्ण नगरी सोबतच श्रीकृष्ण प्रेमी भरपूर प्रमाणात उपस्थित होते.
