NSUI चे राष्ट्रव्यापी अभियान शिक्षा बचाओ – देश बचाओ पोस्टर्स चे लोकार्पण

मोदी सरकारने लागू केलेले नवीन शैक्षणिक धोरण, शिक्षणाचे खाजगीकरण, वाढती बेरोजगारी, स्पर्धा परीक्षांमधील घोटाळे, शिष्यवृत्तीतील कपात यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली असून, लवकरच देशभरात या आंदोलनाचे स्वरूप येणार आहे.

एनएसयूआयचे राष्ट्रीय सचिव रोशन लाल बिट्टू यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आज चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष शफाक शेख यांच्या नेतृत्वाखाली व एनएसयूआयचे राष्ट्रीय संयोजक मार्का अभिनय गौड यांच्या उपस्थितीत एनएसयूआयच्या देशव्यापी अभियान ‘शिक्षण वाचवा – देश वाचवा’च्या पोस्टरचे लोकार्पण करून पत्रकार परिषदेत RejectNEP मोहीम राबविण्यास परवानगी नाकारली.
तरीही आम्ही आमचा निषेध करण्याचा हक्क बजावला. भाजप सर्व अधिकाऱ्यांचा वापर करून आमचा प्रचार उधळून लावू शकते. पण थांबण्याचा आमचा हेतू नाही.
NEP 2020 च्या अभ्यासक्रमात बदललेला इतिहास वादग्रस्त उजव्या विचारसरणीचा समावेश केल्याने, या देशाच्या शिक्षण व्यवस्थेचे आता भगवेकरण होत आहे.
आणि आम्ही होऊ देणार नाही .चंद्रपुर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाचे दौरे करून विद्यार्थी बंधवाना मोदी सरकार विद्यार्थी विरोधी आहे असे समजवून सांगन्याचा प्रयत्न करू .

मोदी सरकारने लागू केलेले नवीन शैक्षणिक धोरण, शिक्षणाचे खाजगीकरण, वाढती बेरोजगारी, स्पर्धा परीक्षांमधील घोटाळे, शिष्यवृत्तीतील कपात यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली असून, लवकरच देशभरात या आंदोलनाचे स्वरूप येणार आहे असे NSUI चे विधानसभा अध्यक्ष शफ़क़ शेख़ यांनी पत्रकार परिषदेत बोलले.यावेळी युवक काँग्रेसचे सरचिटणीस सोनू भाऊ चिवंडे, एनएसयूआयचे नेते उमेश बर्डे, प्रणित तोडे, प्रज्वल कासवटे, साहिल दहिवले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.