
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव शहरातील गेली पाच वर्षांपासून घरकुल लाभार्थींना त्यांच्या जागेचे पट्टे देण्याबाबत प्रशासन दिरंगाई करीत आहे, यासाठी आंदोलन मोर्चे सुद्धा काढण्यात आले होते कित्येक दिवसापासून लाभार्थी हे ताटकळत असून त्यांना लाभ घेता येईना. काही दिवसाआधी शिवाजी नगर येथे मोजणी करण्यासाठी आले होते दोन दिवसा नंतर मशीन बंध पडली तेव्हा पासून मोजणी करण्यासाठी आलेच नाही असे नागरिकांकडून ऐकण्यात येत आहे. शहरातील बऱ्याच प्रभागा मध्ये अजूनपर्यंत पटे मिळाले नसून नवीन कुटुंब घरकुल पासून वंचित राहत आहे. अनेकांनी याचा पाठपुरावा करून सुद्धा हि कामे निकाली लागली नसून येथील अधिकारी ढकलचाल करीत आहे, त्याबाबत जाब विचारण्यासाठी आज शिवसेनेचे शिष्टमंडळ भुमि अभिलेख कार्यालय येथे उप अधिक्षक भारत गवई साहेब यांच्याशी घरकुल लाभार्थी यांच्या जागेची त्वरित मोजणी करुन पट्टे वाटप करण्यासंदर्भात प्रदिर्घ चर्चा करण्यात आली तसेच नगर पंचायत कडे चार लाख सत्ताविस हजार रुपये बाकी असून दोन लाख हे भरण्यात आले आहे तरी लवकरच मोजमाप करण्यास सुरुवात केल्या जातील अशे सांगण्यात आले, तांत्रिक अडचण व अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे दिरंगाई झाली असून गवई साहेबांनी प्रकरण मार्गी लावुन सहकार्य करण्याचे अभिवचन शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले त्यावेळी उपस्थितीमध्ये शिवसेना तालुका प्रमुख विनोद भाऊ काकडे, शहर प्रमुख राकेश भाऊ राऊळकर ,शिवसेना शहर संघटक इमरान पठाण, व्यापारी आघाडीचे शहर प्रमुख सुनिल क्षिरसागर, जेष्ठ शिवसैनिक शंकर भाऊ गायधने यांची उपस्थिती होती.
