
सहसंपादक : रामभाऊ भोयर
वडकी येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त ‘आमदार केसरी शंकरपट’ स्पर्धा रंगणार आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या पुढाकाराने २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत (अ) आणि (ब) गटात एकूण १८ रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. त्यामुळे, शंकरपटाचा हा थरार पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
शंकरपटाचे उद्घाटन २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, ओबीसी प्रदेशसदस्य राजुभाऊ डांगे, ठाणेदार सुखदेव भोरकडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर, २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ पार पडणार आहे. सोमेश्वर महाजन यांच्या शेतात ही स्पर्धा पार पडणार आहे. या शंकरपटात (अ) गटात प्रथम पारितोषिक ५१ हजार रुपये (भाजप राळेगाव), द्वितीय ३१ हजाररुपये (व्यापारी संघटना वडकी), तृतीय २१ हजार रुपये (विद्याताई लाड), चतुर्थ १५ हजार रुपये (राजुभाऊ डांगे व अनिल राजूरकर), पाचवे १० हजार रुपये (रुपेश बोरकुटे, किशोर जुणूनकर), सहावे ९ हजार रुपये (विजय पुसदेकर), सातवे ७हजार रुपये (जयेश मांडवकर), आठवे ५ हजार रुपये (सचिन नक्षीने) तर नववे पारितोषिक ४ हजार रुपये (प्रशांत लाकडे व राजू उरकुडे) असे आहे. (ब) गटात प्रथम पारितोषिक ३१ हजार रुपये (संजय काकडे), द्वितीय २१ हजार रुपये (किरण चौधरी), तृतीय १५ हजार रुपये (विनोद मांडवकर व राजेश ढगे), चतुर्थ ११ हजार रुपये (विशाल पंढरपूरे), पाचवे ११ हजार रुपये (चित्तरंजन कोल्हे), सहावे ९ हजार रुपये (रवींद्र राऊत), सातवे ७ हजार रुपये (गणेश देशमुख), आठवे ५ हजार रुपये (मनोज गावंडे) तर नववे पारितोषिक ४ हजार रुपये (पियुष महाजन) असे आहे. या शंकरपटासाठी लिटिल मास्टर प्रणव गावंडे यांचा बुलंद आवाज लाभणार असून केशव भोसारकर आणि प्रशांत इंगोले घडीचालक म्हणून काम पाहणार आहेत. शंकरपटाच्या यशस्वी आयोजनासाठी संजय काकडे, अनिल नंदूरकर, दिलीप कडू, रवींद्र चौधरी यांच्यासह अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
