कौतुकास्पद…राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत ‘जिवनचा’ डंका

सहसंपादक:रामभाऊ भोयर

राळेगांव तालुक्यातील धुम्मक चाचोरा येथील जिवन जानकिदास वाढई हा युवक राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत महाराष्ट्रातुन प्रथम आला आहे.ग्रामीण भागातील जीनवच्या या घवघवीत यशाने तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. परिणामी जीवन कौतुकास पात्र आहे.

सद्यस्थितीत जीवन संत गाडगे बाबा अमअमरावती येथे शिक्षणशास्त्र पदव्युत्तर विभागात शिक्षण घेत आहे.गोंडवाना विद्यापीठ गड‌चिरोली अंतर्गत येणाऱ्या चिंतामणी विज्ञान महाविद्यालय पोंभूर्णा,(जि चंद्रपूर) येथे स्वर्गीय वसंतरावजी दोंतुलवार यांच्या १४ व्या स्मृती प्रित्यर्थ राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.”समान् नागरी कायदा ” हा या स्पर्धेचा विषय होता.

सद्यस्थितीत देशात या ज्वलंत विषयावर बऱ्याच ठिकाणी चर्चा सुरु आहे.यात जिवन वाढई या युवकाने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत राज्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. परिणामी जीवनचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

जिवन याला आई-वडील, शिक्षक व मिंत्र- परिवार यांचे मार्गदर्शन लाभले.विशेष म्हणजे जीवनची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे.परिणामी जीवन चे सर्वत्र कौतुक होत आहे. जिवनला त्याच्या मेहनत व चिकाटीचे फळ मिळाल्याचे सुतोवाच सर्वदूर ऐकीवात आहे.