/
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक वसंत पुरके यांनी आज दिनांक 2810/2024 रोजी नामांकन सादर करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात राळेगाव, कळंब, बाभुळगाव तालुक्यातील व पांढरकवडा तालुक्यातील मोहदा सर्कलच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर तेलंगणाचे आमदार रवी मल्लू रेड्डी , काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, काँग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल मानकर,अशोकराव घारफळकर, सभापती प्रविण देशमुख, मनिष पाटील, प्रवक्ते प्रविण देशमुख, सौ. वैशाली संजय देशमुख,सौ.संध्या अशोकराव बोबडे, संजिवनी कासार,स्वाती सवाई,स्वाती येंडे,वर्षाताई निकम,ओबीसी विभाग यवतमाळ जिल्हा अध्यक्ष इंजिनीअर अरविंद वाढोणकर , शिवसेना संपर्कप्रमुख दिगांबर मेश्राम, अँड सिमा तेलंगे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर मंडळींनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात तेलंगणाचे आमदार रवी मल्लू रेड्डी , प्रफुल्ल मानकर, प्राध्यापक वसंत पुरके सर, माणिकराव ठाकरे यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला.यावेळी उपस्थित मान्यवर मंडळींनी सर्व सामान्य माणसाला, शेतकऱ्यांना, कर्मचाऱ्यांना चांगले जीवन जगायचे असेल तर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणणे गरजेचे आहे अशी कळकळीची विनंती भाषणातून केली.व उपस्थित जनतेचे आभार व्यक्त केले.या कार्यक्रमात सुरवातीला कार्यक्रम झाल्यानंतर वसंत जिनिंग पासून भरपूर जनसमुदायाची रॅली काढली ती रॅली शांतीनगर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक,माळीपुरा मार्गे मुख्य मार्केट मधून क्रांती चौकातून रावेरी चौकातून तहसील कार्यालयात कमीत कमी दहा ते बारा हजार लोकांच्या जनसमुदायात तहसील कार्यालयाजवळ पोहचली.त्यानंतर प्राध्यापक वसंत पुरके सरांनी काही मोजक्या नेते मंडळींच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज सादर केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू नागतुरे यांनी केले तर आभार राजेंद्र तेलंगे यांनी मानले.या कार्यक्रमाला असलेली उपस्थिती खरोखरच महाविकास आघाडीला आनंद देणारी आली.या कार्यक्रमाला बाभुळगाव, कळंब तालुक्यातील, व राळेगाव तालुक्यातील महाविकास आघाडीचे महत्त्वाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.या कार्यक्रमाला असलेली उपस्थिती महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक वसंत पुरके सर यांना विजयाचे संकेत देऊन गेली असून सर्वत्र हा चर्चेचा विषय ठरला असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राळेगाव तालुक्यातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.