
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यात रिधोरा येथिल अखिल भारतीय गुरुदेव सेवा भजन मंडळ यांनी गोदेडा ता. चिमुर जिल्हा चंद्रपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धेत सहभागी होवून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त केले आहे.सदर गोदेडा या गावांमध्ये
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या तपोभुमिमधे
दरवर्षी प्रमाणे यावर्षी 63 वा गुंफा यात्रा महोत्सव ४ जानेवारी रोजी साजरा करण्यात आला होता त्यामध्ये राज्यस्तरीय खंजेडी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पुरूष गटात एकुण25 मंडळाने सहभाग घेतला होता. एका गावतील सात भजनी सदस्य अशी नियमातील अट असल्या कारणाने खर्याअर्थाने प्रामाणिकतेने राष्ट्रसंताच्या विचारांचा समाजामध्ये प्रचार करणाऱ्या मंडळाचा आदर झाला होता या मध्ये रिधोरा येथील अखिल भारतीय .गुरूदेव सेवा मंडळ रिधोरा ता. राळेगांव जि.यवतमाळ यांनि प्रथम क्रमांक पटकवला त्यांच्या या यशाचे गावकरी तसेच तालुक्यातील गुरूदेव सेवकांनी अभिनंदन केले आहे.
