

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत गणराज्य दिनानिमित्त जि. प. प्राथमीक शाळा मुधापूर येथे दिनांक २५ जानेवारी २०२३ रोजी व दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे. दिनांक 25 जानेवारी 2023 धानोरा केंद्रातील शिक्षकांचा सन्मान दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी दुपारी एक वाजता दुपारी एक वाजता एक वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहनराव देऊळकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती मुधापूर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शेख लुकमान साहेब गटशिक्षणाधिकारी पं.स. राळेगाव श्रीमती सरलाताई देवतळे विस्तार अधिकारी शिक्षण राळेगाव चंद्रभान शेळके विस्तार अधिकारी शिक्षण राळेगाव विजय दुर्गे केंद्रप्रमुख धानोरा दादाराव पोटे उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती मुधापूर तसेच सत्कारमूर्ती अनिल धोबे मुख्यध्यापक, विजय दुर्गे केंद्रप्रमुख, बाबाराव घोडे उच्च श्रेणी मुख्याध्यापक, शंकरराव वाघाडे से.नि. उच्च श्रेणी मुख्याध्यापक, वसंतराव बरडे से.नि. मुअ. राजेश्वर मडावी से.नि.मु.अ. भास्कर खंडाळकर मु.अ. परसोडा. यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे धानोरा केंद्रातील सर्व शिक्षकांचा वृक्ष भेट देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर दुपारी 3.30 ते 6.00पर्यंत मूधापूर येथील कार्यरत असलेल्या शिक्षकांकडून मूधापूर वासियांना भोजन देण्यात आले. त्यानंतर लगेच सायंकाळी 6.30 वाजता शाळा व्यवस्थापन समिती मुधापूर व माता पालकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहनराव देऊळकर, प्रमुख अतिथी म्हणून रितेश भाऊ भरूट रूग्ण सेवक , सौ प्राची ताई रितेश भाऊ भरूट , समाजसेविका सौ नीलम ताई देठे, पोलीस पाटील मुधापूर. अतुल भाऊ जवादे, पोलीस पाटील परसोडा. संजय भाऊ मुनेश्वर, पोलीस पाटील पारडी सौ. किरणताई देऊळकर गटप्रमुख सावित्रीबाई माता पालक गट ,मुधापूर सपना ताई पोटे ,राजमाता जिजाऊ माता पालक गट मुधापूर हे उपस्थित होते .सर्व सदस्य व पालकांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. व त्यानंतर लगेच सायंकाळी 8.00 वा. समाज प्रबोधनात्मक व मनोरंजनात्मक भारुडाचा कार्यक्रम भारुडाचा कार्यक्रम ह.भ.प. श्री खुशाल महाराज वैद्य बुटीबोरी जि. नागपूर यांनी रात्री 10.00 पर्यंत बहारदार कार्यक्रम केला. दिनांक 26 जानेवारी 2023. गणराज्य दिन ध्वजारोहण कार्यक्रम. सकाळी 7.00वाजता प्रभातफेरी काढण्यात आली. सकाळी 7.45ला ध्वजारोहण करण्यात आले. आणी त्यानंतर 8.30 वा. मुधापूर गावातील नागरीकांनी शाळेला दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहनराव देऊळकर प्रमुख अतिथी म्हणून गजानन भोयर सचिव ग्रामपंचायत परसोडा सौ नीलम ताई देठे पोलीस पाटील मुधापूर प्रमोद भाऊ देठे शिक्षण तज्ञ मुधापूर दादाराव पोटे , उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती मुधापूर हे होते. यांच्या हस्ते गावातील सर्व नागरिकांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर लगेच दुपारी 1.30 वाजता. महिलांचा सन्मान सोहळा व विविध स्पर्धा , तसेच हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये संगीत खुर्ची, टिकली स्पर्धा , रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. नीलम ताई देठे प्रमुख पाहुणे सौ. ज्योतीताई मोहनराव गावंडे , वैशालीताई अतुल भाऊ जवादे ज्योत्स्ना ताई सुभाष पारधी सौ जयश्रीताई तुकाराम हाते व गावातील सर्व बचत गटांच्या सदस्य माता पालक गटाच्या सदस्य शाळा व्यवस्थापन समिती महिला सदस्य व गावातील सर्व महिला उपस्थित होत्या. त्यानंतर सायंकाळी 6.30 वाजता. जि प प्राथमीक शाळा मुधापूर येथील विद्यार्थ्यांच्या विविध गुण दर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला.
मुधापूर येथील सुपुत्र दामोधर वामनराव देठे अभियंता, वणी यांनी त्यांचे वडील स्व. वामनराव देठे यांचे स्मॄती प्रित्यर्थ शाळेला डीजीटल करण्यासाठी 80 हजार रुपये देणगी दिली. अशा दाणशूर व्यक्तिमत्त्वाचा सत्कार जि.प. च्या वतीने कर्तव्यदक्ष गोडे साहेब उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद यवतमाळ यांनी व पोलीस पाटील सौ.निलमताई देठे, तसेच अध्यक्ष मोहनराव देऊळकर यांनी केला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहनराव देऊळकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती मुधापूर तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटक कर्तव्यदक्ष प्रदीप राव गोडे साहेब उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद यवतमाळ हे होते त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून पप्पू पाटील भोयर विस्तार अधिकारी शिक्षण जिल्हा परिषद यवतमाळ गजानन भोयर सचिव ग्रामपंचायत परसोडा भुमन्ना कसरेवार आदर्श शिक्षक तथा मुख्याध्यापक खैरगाव कासार, प्रमोद भाऊ देठे शिक्षण तज्ञ मूधापूर सौ नीलम ताई देठे हे होते सन्माननीय गोडे साहेबांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करून सर्व गावकऱ्यांना मार्गदर्शन केले व यवतमाळ जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या आणि केवळ 20 विद्यार्थी असून एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला आणि तो ही अत्यंत सुंदर स्तुत्य, उत्कृष्ट असा बहारदार कार्यक्रम केला. याबद्दल सर्व गावकरी मंडळींचे कौतुक केले ,सन्माननीय गोडे साहेबांनी सावर ता. बाभूळगाव येथील शाळेवर शिक्षक असतांना सुभाष सारख्या गरीब विद्यार्थ्याला शिक्षणात मदत केली त्यामुळेच तो डीएड करू शकला गोडे साहेबांनी दोन वर्षांचा डीएड चा खर्च केला . आणि आज गोडे साहेबांचा विद्यार्थी एक आदर्श शिक्षक म्हणून मुधापूर येथे गेल्या सतरा वर्षांपासून अविरत उत्कृष्ट अशी सेवा देत आहे व विशेष म्हणजे गोडे साहेबांचा विद्यार्थी असलेला सुभाष पारधी नावाचा शिक्षक याच्या आयोजनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला आणि आतापर्यंत तब्बल सतरा वर्षे एकाच शाळेवर अगदी नोकरीवर लागल्यापासून आजतागायत तिथेच कार्यरत असून सुभाषला सांभाळल्याबद्दल मुधापूर येथील सर्व गावकऱ्यांचे आभार मानले सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप क्षीरसागर सर व संचालन सुभाष पारधी प्रवीण तीतरे व कु मानसी गावंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन तुकाराम हाते यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समिती मुधापूर व संपूर्ण मुधापूर ग्रामवासी यांनी केले.
