मकर संक्रांतीच्या उत्सवानिमित्ताने भेटवस्तू, वाण खरेदीसाठी महिला मंडळाची लगबग सुरू


प्रतिनिधी: प्रवीण जोशी, ढाणकी

मकर संक्रांतीचा महिला मंडळाचा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय काही कारणास्तव मतभेद मनभेद झाल्यास त्यातील दुरावा व कटुता दूर व्हावी आणि पुन्हा नियमित प्रमाणे दैनंदिन संबंध दृढ व्हावे असा यामागील सणाचा उद्देश असावा म्हणून की काय तिळगुळ घ्या व गोड गोड बोला अशी एक जुनी मन प्रसिद्ध आहे.
तसेच विशेष करून हा सण महिला मंडळासाठी पर्वणीच असते यावेळी महिलांनी तीळ आणि गुळाच्या सोबत वाण देण्यासाठी अर्थातच भेटवस्तू देण्यासाठी बाजारपेठेमध्ये येण्यास सुरुवात केलेली बघायला मिळत आहे. यावेळी मकर संक्रांत १५ जानेवारीला आहे. व यावेळी तिळगुळाला विशेष महत्त्व असून यावेळी माता-भगिनी एकमेकींना कुंकू लावून वान भेट देतात. यामुळे संबंधित दिलेल्या भेटरुपी वानातून वर्षभर आठवण तेवत राहील हा मागचा उद्देश असावा. म्हणून हा सण उत्सव महिलांसाठी विशेष असतो वाणाच्या रूपाने भेटवस्तू देण्यासाठी दुकानांमध्ये महिला मंडळाची गर्दी बघायला मिळत आहे. यामध्ये स्टील भांड्यासोबत प्लॅस्टिकच्या वस्तू व सौंदर्य प्रसाधने व इतर साहित्य खरेदी करण्यास महिला मंडळ व्यस्त दिसत आहे. तिळगुळा सोबत तिळापासून बनविलेल्या गोड पदार्थाची खरेदी सुद्धा होताना दिसत आहे. तसेच ढाणकी शहरातील बाजारपेठेत व्यापारी तिळगुळाला अनुसरून पदार्थाची विक्री करत आहेत. विशेष म्हणजे हा सण जानेवारी महिन्याच्या 14 किंवा पंधरा तारखेला येतो बोर आणि उसाची मागणी मकर संक्रांति सणांमध्ये असते बोर आणि उसाची पूजा केली जाते यामुळे शहरी भागामध्ये ऊस विकत घ्यावा लागतो ग्रामीण भागामध्ये असे चित्र पाहायला मिळत नाही. विदर्भात व संपूर्ण महाराष्ट्रात मकर संक्रांत उत्सव तिळगुळ देऊन साजरा केला जातो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणून एकमेकांना शुभेच्छा देण्याची परंपरा आहे. पण यावर्षी तिळा गुळाचा गोडवा हा थोडाफार महाग झाल्याची पण चर्चा आहे. कारण तिळाचे भाव वाढले असून त्यात भर म्हणून की काय गुळाचे भाव सुद्धा तेजीत आहेत. मकर संक्रांति निमित्त महिला एकमेकींना वान भेट वस्तूच्या रूपात देतात. यावर्षी भेट वस्तूच्या रूपातील वस्तूच्या किमतीमध्ये दहा ते पंधरा टक्के वाढ झाली आहे. मग त्यामध्ये स्टीलचे भांडे प्लॅस्टिकचे भांडे सौंदर्यप्रसाधने घरामध्ये वापरता येतील अशा वस्तू महिला एकमेकींना वाणाच्या स्वरूपात भेट म्हणून देत असतात थोडीफार महागाई असली तरी महिला मंडळ मात्र याकडे दुर्लक्ष करून आलेला सण उत्साहात पार पडतील एवढे नक्की व यावेळी बाजारपेठेतील बांगड्याच्या व साडीच्या दुकानांमध्ये महिला खरेदी करताना दिसत आहेत.