
् राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झाडगाव येथील सहायक शिक्षक रमेश टेंभेकर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन नागपूर येथील,, मदत सामाजिक संस्था.. या सामाजिक संस्थेने क्रांतिबा क्रांतीज्योती शैक्षणिक सेवारत्न पुरस्कार जाहीर केला असून हा पुरस्कार येत्या 26 डिसेंबर 2022 रोजी या संस्थेकडून नागपूर येथे देण्यात येणार असून त्यांच्या कार्याची विद्यालयाने दखल घेऊन शिक्षकदिनी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला होता.या पुरस्काराने झाडगाव परिसरात, शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले असून विद्यालयाकडून सरांना विद्यालयाचे प्राचार्य विलास निमरड यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या त्यावेळी विद्यालयातील शिक्षक श्रावनसिंग वडते,दिगांबर बातुलवार, रंजय चौधरी,राजेश भोयर,मोहन आत्राम,सौ.वंदना वाढोणकर,स्वाती नैताम, वैशाली सातारकर,शुभम मेश्राम, दिपाली कोल्हे, अश्विनी तिजारे,रूचिका रोहणकर,वाल्मिक कोल्हे,पवन गिरी, बाबूलाल येसंबरे, विनोद शेलवटे उपस्थित होते.
