
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यवतमाळ जिल्हा भारतीय जनता पार्टी चे जिल्हा अध्यक्ष अॅड.प्रफुल्लसिंह चौहान यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राळेगाव येथील मित्रपरिवारातर्फे माऊली वृद्धाश्रम धोत्रा येथे वृद्धाश्रमात शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे ही गरज लक्षात घेऊन वॉटर फिल्टर देण्यात आले. आपण समाजात राहत असून आपलीही समाजाप्रती काही सामाजिक बांधिलकी आहे ही गोष्ट युवकांनी लक्षात घेऊन हा उपक्रम राबविल्याबद्दल सर्व स्तरातून प्रसंशा होत आहे यावेळी.ऍड प्रफुल्ल चौहान, विनयमुनोत, बबलू सैय्यद,ऍड, असीम शेख, ऍड. चेतन गलाट, ऍड. योगेश ठाकरे, ऍड कारिया, आमिर पठाण, कुणाल पटेल, मित कारिया, तसेच वृद्धाश्रमाचे संचालक सुरेंद्र रुद्राक्षवार गावातील मंडळी उपस्थित होते
