निंगनुर गावातील दिवसा अंधार,ग्राम पंचायत कारभाराचा लख्ख उजेड

प्रतिनिधी प्रवीण जोशी, ढाणकी : –

        

ग्राम पंचायत अंतर्गत निगंनुर गावात सर्वत्र विद्युत पोलवर बसविण्यात आलेले पथदिवे बरेच महिन्यापासून रात्रंदिवस २४ तास सुरुच राहात असल्यामुळे विजेचा अनाठाई वापर होत आहे . विद्युत कंपनीने याची तकाळ दखल घेऊन अनाठाई विजेचा अपव्यय थांबवावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे .
निंगनुर गावामध्ये ग्राम पंचायत अंतर्गत असलेल्या विद्युत पोलवरील लाईटसाठी मिटर बसविण्यात आले नसल्याने लाईट चालु बंद करता येत नाही . त्यामुळे गावात 24 तास विज पथदिवे सुरुच राहात आहेत मागील अनेक दिवसांपासून हा खेळ सुरु असतांना मात्र ग्राम पंचायतला याबाबत कुठलेही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे . राज्यात सर्वत्र विजेचा तुटवडा असल्याने विजेच्या लपंडावाबाबत सर्वत्र ओरड सुरु असतांना मात्र निंगनुर येथील ग्राम पंचायतचा कारभार मात्र लख्ख उजेडात सुरु असल्याचा आरोप सुज्ञ नागरिक करीत आहेत . विद्युत वितरण अधिकाऱ्यांनी याची तत्काळ दखल घेऊन विजेचा अपव्यय करणाऱ्या ग्रामपंचायतच्या जबाबदार अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी .