
सहसंपादक : रामभाऊ भोयर
पिंपळशेंडा येथील श्री कृष्ण मंदिरात नुकत्याच पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात नंद गवळी समाज संघटनेची राळेगाव तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. आजपर्यंत समाज विविध कारणांनी विखुरलेला असला तरी या संघटनेच्या माध्यमातून एकी, प्रगती आणि संघटनात्मक बळकटी साधण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष ओंकार चेके, कार्याध्यक्ष पंडितराव बोपटे, सचिव सुभाष काकडे, संघटक विजय चावरे, प्रसिद्धी प्रमुख पवन झामरे, सहसचिव चंद्रपाल कालोकार, सहसंघटक राजुभाऊ साठे यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष पवन धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली.
🔹 नवी कार्यकारिणी (राळेगाव तालुका)
अध्यक्ष : दिपक अशोकराव येवले
उपाध्यक्ष : पुरुषोत्तम अण्णाजी मेहर
सचिव : संदीप विठ्ठलराव पाटील पैक कार्याध्यक्ष : विनोद भुराजी पाटील पैक कोषाध्यक्ष : राजेंद्र कवडुजी गळहाट संघटक : गोविंदराव काळे तसेच पुंडलिकराव पाटील पैक, देविदास पाटील पैक, संजय पाटील पैक, गणेश येवले, राजुभाऊ साठे, गजानन पाटील पैक, संदीप येवले, दिनेश गळहाट, राजेंद्र गळहाट, नंदकिशोर पाटील पैक, दीपक कलोकार यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांनी समाजाच्या एकीचा, प्रगतीचा आणि संघटनात्मक बळकटीचा संकल्प व्यक्त केला.
