
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील पळसकुंड, उमरविहीर गट ग्रामपंचायत वर दिनकरराव विठ्ठलराव शिंदे गट व वनिष निजाम घोसले गट यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. सविस्तर वृत्त असे पळसकुंड, उमरविहीर गट ग्रामपंचायत मध्ये तिहेरी लढत झाली होती. सदर तीनही लोकांना ही निवडणूक प्रतिष्ठेची वाटत होती यात कॉंग्रेस विचार वंत पक्षाचे नेते दिनकरराव विठ्ठलराव शिंदे गट व वनिष निजाम घोसले गट यांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवली होती तर भाजपचे माजी तालुका अध्यक्ष अनिल जवादे तर भाजपचे समर्थक मनोरंजन विस्वास या तीनही गटाने आप आपले उमेदवार उभे केले होते यात दिनकरराव विठ्ठलराव शिंदे व वनिष निजाम घोसले यांच्या गटाचे सरपंच पदा सह ६ उमेदवार निवडून आले आहेत तर अनिल जवादे यांच्या गटाचे ३ उमेदवार निवडून आले आहेत परंतु मनोरंजन विस्वास या गटाला खातेही उघडता आले नाही.सदर दिनकरराव विठ्ठलराव शिंदे व वनिष निजाम घोसले यांच्या गटाचे थेट जनतेतून निवडून आलेले उमेदवार म्हणून वनिष निजाम घोसले हे सरपंच म्हणून निवडून आले तर सदस्य म्हणून सुभाष विठ्ठल शिंदे, ज्ञानेश्वर विठ्ठल सीडाम,पुष्पकला प्रल्हाद राऊत,आशा बबनराव ढोबळे, कांताबाई हीराचंद पवार हे निवडून आले आहेत तर अनिल जवादे गटाचे वर्षा राजु कुटे, मीना राजु कोडापे, रोहीदास पवार हे निवडून आले आहेत परंतु भाजपा समर्थक मनोरंजन विस्वास यांच्या गटाला खातेही उघडता आले नाही. सदर ९ पैकी ६ जागेवर दिनकरराव विठ्ठलराव शिंदे गट व वनिष घोसले गट यांचें उमेदवार निवडून आल्याने नवनिर्वाचित सरपंच वनिष घोसले यांनी पळसकुंड, उमरविहीर गावातील संपूर्ण मतदार बांधवांचे आभार मानले आहे. आपल्या विजयाचे श्रेय गावातील सुभाषराव विठ्ठलराव शिंदे, प्रकाश घोसले, मंगेश दिनकरराव शिंदे, प्रशांत अजाबराव शिंदे, जानराव रामपुरे,लखमा टेकाम, भाऊराव कुडमते, तुळशीराम दारुंडे, कृष्णाजी आत्राम यांना दिले आहे.
