
सहसंपादक : रामभाऊ भोयर
ज्यांनी आपल्या रक्तातल्या साखरेचे विष पचवून आपल्या पाठीच्या मणक्याचे पाणी होईपर्यंत तुम्हा आम्हा सर्वांना न्याय ,स्वातंत्र्य, समता,आणि बंधुत्व जगता याव यासाठी ३९५ कलमी मानव मुक्तीचा जाहीरनामा लिहिला त्या डॉ. बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानिक सामाजिक समतेचे विचारधारा घरोघरी पोहोचावी याची ओळख व्हावी यातून प्रेरणा घेऊन आपल्यामध्ये समानतेचा भाव निर्माण व्हावा या उद्देशाला समोर ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात दिं.१३,१४ एप्रिल २०२५ ला दोन दिवसीय विविध सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
रविवार दिं.१३ एप्रिल २०२५ दुपारी ४:०० वाजता वकृत्व स्पर्धा (वयोगट ५ ते १६ मुले मुली )या वकृत्व स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून मा.गोवर्धन वाघमारे मा.माणिकराव करमणकर.मा. राष्ट्रपाल भोंगाडे मा. अँड मधुसूदन अलोणे ,डॉ.विठ्ठल लढे. मा.देवराव नाखले हे असतील तर परीक्षक म्हणून भारतीताई ताठे मॅडम, गौरव गोटे सर हे असणार, सायंकाळी ६:०० वाजता वेशभूषा स्पर्धा खुली (मुले मुली महिला पुरुष) यांच्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले,यांच्या जीवनपटावर आधारित या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुधाकर लोहवे, बाबाराव नगराळे ,इंद्रजीत लभाने, सोनालीताई ताकसांडे, गुरुदास नगराळे, तर परीक्षक म्हणून प्रज्ञाताई पाटील मॅडम, अर्चनाताई जवादे मॅडम, ह्या असतील त्यानंतर सायंकाळी ७:०० वाजता जाहीर व्याख्यान वक्ते (डॉ. ओम प्रकाश फुलमाळी) सायंकाळी ८:०० वाजता एक पात्री नाटक मी रमाई बोलते सादरकर्त्या सुजाता ताई वाठोरे मॅडम त्यानंतर सायंकाळी ९ :३० मिनिटांनी सांस्कृतिक कार्यक्रम (समूह नृत्य एकेरी नृत्य ) सादर करते भीम कन्या समूह या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जितेंद्र जवादे ,राजू पुडके, जीवने बाबू ,दिलीप नगराळे, साहिल नगराळे ,अमोल मगर, अश्विनी फुलमाळी, हे असतील तर सायंकाळी १०:३० वाजता राळेगाव आयडियल खुली गायन स्पर्धा (करा ओके) (समाजसुधारक व महापुरुषाच्या जीवन चरित्रावर आधारित ) या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश शेळके ,अरविंद गोटे ,प्रज्ञापाल जीवने, धम्मानंद तागडे ,नाखलेताई ,तेलतुंबडे मॅडम, संगीताताई नगराळे ,तर परीक्षक म्हणून प्रकाश कळमकर व प्रवीण थूल हे असतील या सर्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी स्पर्धेत नाव नोंदणी करिता सौरभ राजू पुडके मोबाईल नंबर ७०८३७३६१३४,७६२०२१९६५३ तर सोनू दिलीप नगराळे मोबाईल नंबर ७२४८९१५५७५ या नंबर वर सर्व स्पर्धकांनी आपले नांव दिं. १२ एप्रिल २०२५ या तारखेपर्यंत वरील संपर्क क्रमांकावर नोंदणी करणे अनिवार्य आहे अन्यथा वेळेवर नाव नोंदणी केल्या जाणार नाही, त्यानंतर सायंकाळी ११:३० वाजता पाळणा गीते,तर ११:४५ मिनिटांनी लेझीम नृत्य सादर केल्या जाणार आहे.
दिं . १४ एप्रिल २०२५ रोज रविवारला सकाळी ७:०० वाजता समूह नृत्यद्वारे महामानवाला मानवंदना दिली जाईल सकाळी ८:०० वाजता भव्य बाईक रॅली निघणार आहे, सकाळी ९:००वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन व सामूहिक त्रिशरण पंचशील होईल त्यानंतर १० :०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सुरुवात होणार आहे, सकाळी १०:३० वाजता राष्ट्रीय सेवा योजना पथक इंदिरा गांधी कला महाविद्याल राळेगाव पथनाट्य सादर करणार आहे,११:३० वाजता पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार या पारितोषिक वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विशाल खात्री उपविभागीय अधिकारी राळेगाव हे असणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. अमित भोईटे तहसीलदार ,मा. सिताराम मेहत्रे पोलीस निरीक्षक, मा.सुप्रिया चव्हाण सहायक आयुक्त महानगरपालिका जालना, मा. गिरीश पारेकर मुख्याधिकारी नगरपंचायत राळेगाव , मा.मनोज निसडकर सर प्राचार्य इंदिरा गांधी कला महाविद्यालय राळेगाव हे असणार आहे तर विशेष अतिथी म्हणून रवींद्र शेराम नगराध्यक्ष नगरपंचायत राळेगाव जानराव गिरी उपनगराध्यक्ष नगरपंचायत राळेगाव व सर्व माननीय नगरसेवक नगरसेविका नगरपंचायत राळेगाव हे असतील तर या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून श्याम नगराळे,( माजी केंद्रीय शिक्षक) दिपक आटे ,प्रदीप लोहकरे, राजेंद्र पूडके, विनायक नगराळे, श्याम नगराळे, राजू ताकसांडे, युवराज पाईकराव हे असतील, त्यानंतर सायंकाळी ४:०० वाजता शहरातील शोभायात्रा निघणार आहे तरी या सर्व कार्यक्रमाला बौद्ध उपासक उपासिकांनी तसेच नागरिकांनी या दोन दिवसीय कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक समितीचे अध्यक्ष संदीप लोहकरे ,उपाध्यक्ष सोनालीताई ताकसांडे, प्रशिक भोंगाडे, सचिव डॉ. ओम प्रकाश फुलमाळी सहसचिव रत्नमालाताई जीवने, कोषाध्यक्ष यश घडले, समन्वयक सौरभ पुडके तसेच सदस्य गण यांच्या वतीने करण्यात आले आहे
