
सहसंपादक :: रामभाऊ भोयर
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद यवतमाळ आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत सैनिक पब्लिक स्कूल वडकीच्या १७ वर्षांखालील मुलांनी प्रथम क्रमांक पटकावत अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे.ही स्पर्धा राळेगाव तालुक्यात उत्साहात पार पडली. सैनिक पब्लिक स्कूल वडकीच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक आणि रचनात्मक खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. त्यांची ही कामगिरी तालुक्यात शालेय क्रीडा क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे. संस्थेचे अध्यक्ष रणधीरसिंह दुहन, सचिव सत्यवाणसिंग दुहन, प्राचार्य शेखर नंदुरकर , उपप्राचार्य श्रिया तगडपल्लीवार, तसेच क्रीडा शिक्षक जितेंद्र यादव व राकेश दुहन यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सर्व शिक्षक वृंदांचे सहकार्य या यशामागे ठळकपणे जाणवते. संस्थेच्या या घवघवीत यशाबद्दल सर्व विजयी विद्यार्थ्यांचे, प्रशिक्षकांचे आणि शाळेचे अभिनंदन करण्यात येत आहे.
