
सहसंपादक:- रामभाऊ भोयर
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती !! या संतवचनाला अनुसरून, जल-जंगल, जमिन, माती आणि पाणी या सर्व नैसर्गिक साधनांचे संरक्षण करण्यासाठी राळेगाव तालुक्यातील अंतरगाव येथे रिलायंस फॉऊंडेशन व जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान यवतमाळ यांच्या वतीने दिं ५ जून २०२३ रोज सोमवारला जागतिक पर्यावरण दिनानिमित्य अंतरगाव येथे वृक्षदिंडी काढून घरोघरी तसेच रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करण्यात आले.
या जागतिक पर्यावरण दिनानिमित्य सुरवातीला गावातील महिला मंडळ, वारकरी भजन मंडळी तसेच शाळकरी विध्यार्थ्याच्या सह वृक्षदिंडी काढण्यात आली .त्यानंतर प्रत्येक कुटुंबाला पाच या प्रमाणे फळझाडांचे वाटप करण्यात आले व घरोघरी लागवड करण्यात आली त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी
पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचे महत्व काय या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या जागतीक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी, उमेद अभियानाचे जिल्हा समनव्यक प्रितम हस्ते, मंडळ कृषी अधिकारी विजय धांदे, आत्मा प्रकल्पाचे मयूर शिरभाते, विस्तार अधिकारी पंचायत समिती सुर्वे, गट शिक्षण अधिकारी सौ.देवतळे मॅडम, तलाठी शेंद्रे, रिलायन्स फॉऊंडेशनचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संदिप वायाळ, सरपंच प्रविण
येंबडवार जनसेवा प्रतिष्ठान संस्थेचे व्यवस्थापक जगदीश राऊत, जिल्हा प्रकल्प समन्वयक विजय कन्नाके, ग्रामसेविका मेघा चारभे, उपसरपंच महेंद्र उमरे, रोजगार सेवक रामभाऊ बावणे, ग्राम संघ अध्यक्ष सौ गीताताई तागडे, उद्योग सखी कु. सपना तायडे, तसेच गावातील महिला पुरुष व विद्यार्थी यांनी कार्यक्रमात सहभागी झाले होते या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता छाया कापसे, ज्योती ढाले, कोमल बेलखडे, ज्योती नेहारे, करून भगत, काशिनाथ भगत, संतोष बिलोरकर, गणेश बुरले, गोपीचंद ढाले, भीमराव भगत, सुनिता तोमर, शिल्पा खैरे, गजानन श्रीरामाजवार, वैभव गणवीर, संजय येंबडवार, कविता पेंदोर, वैशाली नागोसे, जया ठाकरे यांनी मोलाचे सहकार्य केले.
