
प्रतिनिधी:प्रवीण जोशी ,ढाणकी
हनुमान दुर्गा उत्सव मंडळ यांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आकर्षक देखावा साकारला आहे,हा देखावा बघण्यासाठी भाविक रोज गर्दी करीत आहे ,या दुर्गा उत्सव मंडळा तर्फे विविध कार्यक्रम व उपक्रमाचे आयोजन करण्यात येते,दररोज सकाळी पाचला आणि सांयकाळी सात वाजता देवीची आरती करण्यात येते,नवमीच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते,हजारो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात,महाप्रसादा नंतर घटविसर्जन करून या उत्सवाची सांगता होते.विशेष म्हणजे गेल्या वर्षी अनेक पोस्टातील सेवा देणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान सुद्धा या मंडळाने केला.
