
सहसंपादक : रामभाऊ भोयर
गेल्या दहा वर्षात गोहत्या बंदी कायदा लागू झाल्यापासून महाराष्ट्र राज्यात मोकाट जनावरे,गायी,बैल,कुत्री यांची संख्या भरमसाठ वाढली आहे.मोकाट कुत्री एकमेकांचा पाठलाग करतात.रात्रंदिवस मोठमोठ्याने विव्हळत किंवा भुंकत असतात.शाळकरी विद्यार्थी किंवा वृद्ध नागरिकांच्या अंगावर धावून जातात.याची कमी म्हणून की काय मोकाट जनावरानी नागरिकाची कोंडी केली आहे.ही जनावरे पहाटे पासून रात्री पर्यंत रस्त्यात मधोमढ ठाण मांडून बसतात..गायी आपल्या वासरासह मातृत्व दाखवत मायेने एक्मेकाना चाटत असतात.देशी जनावरे,गौळारू जनावरे रस्त्यातच प्रातर्वीधी उरकतात..त्या मुळे वाहतुक कोंडी बरोबर स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.कितीही गर्दी झाली,वाहतुक कोंडी झाली,मोठ्याने हॉर्न वाजवले तरी ही जनावरे जागची हलत नाहीत.काही वेळा अचानक मध्येच उठुन उभी राहतात..त्यामुळे अनेकदा लहान मोठे अपघात घडले आहेत.नगर पालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेवून या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा,अशी मागणी जोर धरत आहे.
