
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील खैरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेत दिनांक 3 जानेवारी रोज मंगळवार ला सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली. तसेच आनंद महोत्सव मध्ये विविध कार्यक्रम घेऊन माता पालक सभा घेण्यात आली.
3 जानेवारी 2023 रोज मंगळवार ला बालिका दिनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा खैरी येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक संजय खडसे यांनी करताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत राबविल्या जात असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. सदर वक्तृत्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक व शैक्षणिक योगदान या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर होण्यासाठी विविध स्टॉल लावून स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे ज्ञान दिले. तसेच आनंद महोत्सवामध्ये विविध खेळ ,रांगोळी स्पर्धा ,संगीत खुर्ची ,वक्तृत्व स्पर्धा असे अनेक कार्यक्रम घेण्यात आले.
आनंद महोत्सवानंतर माता पालक सभा घेण्यात आली. यात शाळेचे शिक्षक व माता पालक यांच्यात विविध विषयावर चर्चा होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व शैक्षणिक विषयावर चर्चा झाली. त्यात महादीप परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा, अशा शासनाच्या अनेक सामान्य ज्ञान परीक्षा मध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्यास पालकांनी चालना द्यावी. विद्यार्थ्यास यश संपादन करण्याची हमी आम्हा शिक्षकांची असे सर्व शिक्षकाकडून माता पालक सभेत सांगण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ आरती जगधरे ह्या होत्या. प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय खडसे यांनी संचलन सुरेश सलाम सर यांनी तर आभार प्रदर्शन शेंडे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य तसेच शाळेचे शिक्षक श्री वसंत खाडे, राजेंद्र दुरबुडे, राजकुमार शिंदे, प्रवीण दीडपाये तसेच माता पालक व शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
