

कोरपणा :- तालुक्यातील वडगाव येथे तान्हा पोळा मोठ्या उत्हात साजरा करण्यात आला.
तान्हापोळा हा सण लहान मुलांच्या विरंगुळ्यासाठी व महाराष्ट्रीयन संस्कृती जोपासण्यासाठी साजरा करण्याची प्रथा आहे. हीच संस्कृती जपण्यासाठी वडगाव येथील युवकांनी तान्हापोळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोनाच्या नियमांची अंमलबजावणी करून तान्हापोळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला महात्मा गांधी तंटा मुक्त समितीचे वडगाव चे अध्यक्ष श्रीरामजी भोंगळे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंगजी बुरांडे, अंगणवाडी सेविका मालतीताई पावडे, युवा मंडळचे कार्यकर्ते व गावातील लहान बालगोपाल मोठ्या प्रमाणात पालकवर्ग उपस्थित होते.
