भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सन्मान भूमी पुत्राचा

दिग्रस तालुका प्रतिनिधी शंकर चव्हाण

संविधान निर्माते भारत रत्न Dr. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य बाबासाहेब पुतळा समिती विठाळा व रमाई महिला मंडळ विठाळा यांच्या वतीने Dr. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विठाळा येथे दि.18/4/2023रोजी प्रबोधनकार आयु. माधव वाढवे व संच हदगाव जि. नांदेड यांचा जंगी भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित केले असून या कार्यक्रमा मध्ये Dr. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती विठाळा यांच्या वतीने “सन्मान भूमिपुत्रांचा ” या मथळ्या खाली गुणवंत विध्यार्थी चा सत्कार होणार असून दि.14 एप्रिल रोजी सकाळी 8:30वाजता पंचशील ध्वजारोहन व रमाई महिला मंडळ व सिद्धार्थ नागोराव कांबळे यांचे कडून त्रीशरण पंचशील होईल व समस्त गावकरी यांच्या वतीने महामानव, भारतरत्न, विश्व भूषण, महान कायदे पंडित, संविधान निर्माते. Dr. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन व पुष्पवृष्टी करण्यात येनार असून संध्याकाळी 5:30 वाजता गावातील प्रमुख मार्गाने अभिवादन रॅली काढण्यात येणार आहे वरील कार्यक्रम पार पाडण्यासाठी. नवयुवक पंचशील मंडळ, सेवालाल जयंती उत्सव मंडळ, सर्वाजनिक दुर्गा माता मंडळ, बिरसा मुंडा मंडळ, जय बालाजी मथुरा मंडळ, सार्व जनिक गणेश मंडळ विठाळा यांचा सहभाग होणार आहे